Kolhapur News | पोलीस ठाण्यातच महिलेशी अश्लील वर्तन; कोल्हापुरातील घटनेने खळबळ

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Kolhapur News | जिल्ह्यातील हातकणंगले पोलीस ठाण्यात साफसफाईचं काम करणाऱ्या महिलेशी पगार देण्याच्या बहाण्याने पोलीस ठाण्यातच अश्लील वर्तन केल्याचा प्रकार उघडकीस आला. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. कायद्याचं रक्षण करणाऱ्यांकडूनच अस होत असल्याने पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेचा (Kolhapur News) प्रश्न ऐरणीवर आला आहे.

पोलीस ठाण्यातील कारकूनानं केलेल्या कृत्याची तक्रार पीडितेने पोलीस ठाण्यातील वरिष्ठांकडे केली असता, वरिष्ठांनीही हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला आहे. एवढेच नाही तर पोलिसांनी पीडितेवर दबाव टाकत कोणतीही तक्रार नसल्याचे पीडितेला कॅमेऱ्यासमोर बोलायला भाग पाडलं आहे.दरम्यान, याप्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संबंधित कारकुनाला सक्तीच्या रजेवर पाठवले आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, हातकणंगले पोलीस ठाण्यात (hatkanangale police station) रोजंदारीवर पीडिता साफसफाईचे काम करते. गुरुवारी ती नेहमीप्रमाणे पोलीस ठाण्यात काम करण्यास आली. त्यावेळी संबंधित कारकूनानं तिला कार्यालयात बोलावून तिला पगार देण्याचा बहाणा करत तिच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. पीडितेने हा प्रकार पोलीस ठाण्यातील अन्य कर्मचाऱ्यांना सांगितला. त्यानंतर हे सर्व प्रकरण पोलीस निरीक्षकापर्यंत पोहोचलं. पीडितेची समजूत काढण्यात आली. पोलिसांनी बदनामी टाळण्यासाठी पीडितेवर दबाव टाकून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला आहे.

यासंदर्भात बोलताना पोलीस निरीक्षक के एन पाटील (Police Inspector N.K. Patil) म्हणाले की, पीडितेने कोणतीही तक्रार दिली नाही.
त्यामुळे कारवाईचा प्रश्न येत नाही. पीडितेने तक्रार केल्यास (Kolhapur News) कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

Web Title :- Kolhapur Crime | cleaning worker woman molestation by clerk in hatkanangale police station kolhapur

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Bajaj Finance | पहिल्यांदाच अशी सुवर्णसंधी ! फक्त 101 रुपयात घरी आणू शकता Vivo चा प्रीमियम स्मार्टफोन, जाणून घ्या कधीपर्यंत आहे ऑफर

BJP Vs Shivsena | भाजप नेत्याच्या वक्तव्याने राजकीय खळबळ ! म्हणाले – ’शिवसेनेचे 12 आमदार आमच्या संपर्कात, लवकरच सत्ता बदलणार’

Tata Group | टाटा समुहाच्या टीसीएसला बंपर ‘नफा’ ! गुंतवणुकदारही मालामाल, 40% रिटर्ननंतर मिळणार 700% ‘लाभांश’