Kolhapur Crime News | कोल्हापूरमध्ये भांडणातून तरुणाचा खून

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – Kolhapur Crime News | कोल्हापूरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये कोल्हापूर शहरातील जगतापनगरमध्ये एका तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. त्यामुळे कोल्हापूरमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. ऋषिकेश महादेव सूर्यवंशी असे मृत व्यक्तीचे नाव आहे. (Kolhapur Crime News)

 

कशाप्रकारे झाला खुलासा?

जगताप नगरमधील मैदानामध्ये आज सकाळी काही मुले क्रिकेट खेळत होती. यादरम्यान एक मुलगा बॉल शोधण्यासाठी गेला असता त्याला हा मृतदेह आढळून आला. यानंतर तो तिकडून थेट ओरडत सुटला. यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. यानंतर त्या ठिकाणी लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. (Kolhapur Crime News)

 

यानंतर त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या कोणीतरी याची माहिती पोलिसांना दिली. यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, करवीरचे पोलीस उप अधीक्षक संकेत गोसावी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पुढील तपासाला सुरुवात केली. भांडणातून हा खून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

 

 

 

Web Title :- Pune Crime | missing two and half year boy from pune railway station found after 12 days

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा