×
Homeक्राईम स्टोरीPune Crime News | पुण्यातील विजय काळोखेचा पानशेतजवळ खून, दोघांना अटक

Pune Crime News | पुण्यातील विजय काळोखेचा पानशेतजवळ खून, दोघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | किरकोळ वादातून पुण्याच्या अप्पा बळवंत चौकातील (Appa Balwant Chowk, Pune) कन्या शाळेजवळील विजय लॉज बिल्डींगमध्ये राहणार्‍या युवकाचा पानशेतजवळील (Panshet) आंबीगाव रस्त्यावरील कुरण गावच्या हद्दीतील रानवडी (ता. वेल्हे) येथे लोखंडी सळईने खून करण्यात आला आहे. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह घराच्या बांधकामासाठी खोदण्यात आलेल्या एका खोल खड्डयात पुरण्यात आला (Murder In Pune). मात्र, ही धक्कादायक घटना वेल्हे पोलिसांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आली आहे. (Pune Crime News)

 

विजय प्रफुल्ल काळोखे Vijay Prafulla Kalokhe (38, रा. कन्या शाळेजवळ, विजय लॉज बिल्डींग, अप्पा बळवंत चौक) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी वेल्हे पोलिसांनी नितीन रामभाऊ निवंगुणे Nitin Rambhau Niwangune आणि विजय दत्तात्रय निवंगुणे Vijay Dattatray Niwangune (दोघे रा. आंबी, ता. हवेली) यांना अटक केली आहे. त्यांच्याविरूध्द वेल्हे पोलिस ठाण्यात (Velhe Police Station) खून, खुनाचा पुरावा नष्ट करणे आणि इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि. 13 रोजी दुपारी दोन ते दि. 14 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. यासंदर्भात पोलिस नाईक अजयकुमार शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. (Pune Crime News)

नितीन निवंगुणे आणि विजय निवंगुणे यांनी एकाचा खून केला असून त्याचा मृतदेह त्यांनी नितीनच्या शेतात टाकल्याची माहिती पोलिसांना खबर्‍याकडून मिळाली होती. माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज पवार (API Manoj Pawar) आणि उपनिरीक्षक महेश कदम (PSI Mahesh Kadam) यांनी घटनास्थळी भेट दिली. प्रकरणाचा सखोल तपास करण्यात आल्यानंतर दोघांना अटक करण्यात आली आहे.

 

 

 

Web Title :- Pune Crime News | Murder of Vijay Prafulla Kalokhe in Pune near Panshet, two arrested

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Must Read
Related News