Kolhapur Crime News | गोल्ड लाईफ फसवणूक प्रकरण! नऊ जणांवर गुन्हा, जीएसटी अधिकाऱ्यासह पाच जण अटकेत

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Kolhapur Crime News | दरमहा पाच टक्के परतावा देण्याचे प्रलोभन दाखवून 26 गुंतवणूकदारांची (Investors) 1 कोटी 11 लाख 6 हजार 500 रुपयांची आर्थिक फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गोल्ड लाईफ डिस्ट्रिब्युटर्स कंपनीच्या (Gold Life Fraud Case) प्रमुखासह नऊ जणांवर सोमवारी (दि.11) रात्री राजारामपुरी पोलीस ठाण्यात (Rajarampuri Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Kolhapur Crime News)

याप्रकरणी पोलिसांनी कंपनीचा प्रमुख आणि प्रमोटर जीएसटी अधिकारी (GST Officer) व इतर चार जणांना अटक (Arrest) केली आहे. याबाबत विजया दीपक कांबळे Vijaya Deepak Kamble (वय-43 रा. प्रताप भोसले नगर, सरनोबतवाडी, ता. करवीर) यांनी फिर्याद दिली आहे. (Kolhapur Crime News)

पोलिसांनी कंपनीचा प्रमुख इंद्रजित सुभाष कदम Indrajit Subhash Kadam (वय 46, रा. प्रतिभानगर, कोल्हापूर) याच्यासह राहुल शशिकांत गाडवे Rahul Shashikant Gadve (वय 52, रा. सातवी गल्ली, राजारामपुरी, कोल्हापूर), जीएसटी अधिकारी कुमार जोतिराम उबाळे Kumar Jothiram Ubale (वय 52, रा. राजेंद्रनगर, कोल्हापूर), अमरदीप बाबूराव कुंडले Amardeep Baburao Kundle (वय 49, रा. राजगड कॉलनी, कोल्हापूर), आबासो बाळू वाडकर Abaso Balu Wadkar (रा. मणेर मळा, उचगाव, ता. करवीर) या पाच जणांना आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने (Economic Offence Wing (EOW) अटक केली आहे. तर अतुल वाघ (रा. देवकर पाणंद, कोल्हापूर), शैलेश वाघ (रा. फुलेवाडी, कोल्हापूर), शैलेश मरगज (रा. शिवाजी पेठ, कोल्हापूर) आणि सुनीता आबासो वाडकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर ( Ravindra Kalamkar) यांनी दिलेल्या माहितीनुसार,
राजारामपुरी येथील तिसऱ्या गल्लीत असलेल्या गोल्ड लाईफ डिस्ट्रीब्यूटर कंपनीने (Gold Life Distributors Company)
ऑगस्ट 2022 पासून गुंतवणूकदारांकडून पैसे घेतले. आरोपींनी गुंतवणूकदारांना दरमहा पाच टक्के परतावा देण्याचे
आमिष दाखवले. सुरुवातीचे काही महिने परतावे दिल्यानंतर मार्च 2023 पासून परतावा देणं बंद केलं.
याबाबत काही गुंतवणूकदारांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली होती.
त्यांच्या सूचनेनुसार आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने चौकशी करून कंपनीतील नऊ जणांवर गुन्हा दाखल केला. तसेच पाच जणांना अटक केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ACB Trap News | लाच स्वीकारताना महिला तलाठ्यासह मदतनीस अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune Police MCOCA Action | तरुणाचे अपहरण अन् बेदम मारहाण, तरुणाचा चेहरा विद्रुप करणाऱ्या निखील कुसाळकर टोळीवर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 96 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA

ACB Trap News | कोर्टातील क्लार्कसाठी 50 हजार मागितले, 20 हजार लाच स्वीकारताना वकील अँन्टी करप्शनच्या जाळ्यात