ACB Trap News | कोर्टातील क्लार्कसाठी 50 हजार मागितले, 20 हजार लाच स्वीकारताना वकील अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – ACB Trap News | न्यायालयात प्रलंबित असलेल्या केसचा निकाल आपल्या बाजूने लागण्यासाठी व निकालपत्र प्राप्त करुन घेण्यासाठी कोर्टातील क्लार्क यांना 50 हजार रुपये द्यावे लागतील असे सांगून पहिला हप्ता 20 हजार रुपये स्वीकारताना सोलापुरातील एका वकीलास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (ACB Trap News) रंगेहाथ पकडले. ही कारवाई सोमवारी (दि.11) करण्यात आली.

अ‍ॅड. दयानंद मल्लिकार्जुन माळी Adv. Dayanand Mallikarjun Mali (रा. माळी वस्ती सोरेगाव, विजापूर रोड, सोलापूर) असे लाचखोर वकीलाचे नाव आहे. याबाबत 35 वर्षीय महिलेने सोलापूर एसीबीकडे (ACB Trap News) तक्रार केली होती. त्यानुसार पथकाने 7 डिसेंबर रोजी पडताळणी करुन सोमवारी सापळा रचून दयानंद माळी याला लाच घेताना रंगेहाथ पकडले.

महिला तक्रारदार यांच्याविरुद्ध सह. निबंधक, को ऑप सोसायटी, पुणे (Assistant Registrar, Co-op Society, Pune) या न्यायालयात सावकारी (Moneylender) अपील केसची सुनावणी सुरु आहे. केसचे निकाल तक्रारदार यांच्या बाजूने लावण्यासाठी व निकलपत्रासाठी सह निबंधक को ऑफ सोसायटी, पुणे येथील क्लार्क यांना 50 हजार द्यावे लागतील असे सांगून यातील तक्रारदाराचे वकील दयानंद माळी तक्रारदार यांच्याकडे 50 हजार रुपये लाचेची मागणी करत असल्याबाबत तक्रार सोलापूर एसीबी (Solapur ACB) पथकाला प्राप्त झाली होती.

या तक्रारीची पडताळणी केली असता खासगी इसम वकील दयानंद माळी यांनी तक्रारदार यांच्याकडे त्यांच्या विरोधात
सह. निबंधक को ऑफ सोसायटी, पुणे यांच्या न्यायालयात प्रलंबित असलेल्या केसचा निकाल आपल्या बाजूने
लागण्यासाठी व निकालपत्र प्राप्त करुन घेण्यासाठी तेथील क्लार्क यांना 50 हजार रुपये द्यावे लागतील असे सांगून
पहिला हप्ता 20 हजार रुपये स्वीकारताना (Accepting Bribe) रंगेहात पकडण्यात आले.

ही कारवाई पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे (SP Amol Tambe), अपर पोलीस अधीक्षक शीतल जानवे
(Addl SP Sheetal Janve) यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर एसीबीचे पोलीस उपअधीक्षक गणेश कुंभार
(DySP Ganesh Kumbhar), पोलीस निरीक्षक चंद्रकांत कोळी (PI Chandrakant Koli), पोलीस अंमलदार सोनवणे,
पकाले, गजानन किनगी, रवी हाटखिळे, चालक राम सुरवसे यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maratha Reservation | २५ डिसेंबरपूर्वी कुणबी-मराठा तिढा सुटणार; मुख्यमंत्र्यांच्या शब्दावर नरेंद्र पाटील यांना विश्वास

Anand Nirgude Resignation | मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आनंद निरगुडे यांचा राजीनामा; राज्य शासनाने स्वीकारला

Anand Nirgude Resignation | राज्य मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याने खळबळ, सरकारने माहिती लपवली, विरोधकांचा आरोप

Devendra Fadnavis | भुजबळांच्या पाठीशी भाजपा आहे का? देवेंद्र फडणवीस स्पष्टच म्हणाले – ”मी आमदार व्हायच्या आधीपासून…”

Pune Police MCOCA Action | तरुणाचे अपहरण अन् बेदम मारहाण, तरुणाचा चेहरा विद्रुप करणाऱ्या निखील कुसाळकर टोळीवर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 96 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA