Kolhapur Crime News | शिवज्योत आणताना मोटारसायकल्स एकमेकांवर धडकून 2 शिवभक्तांचा दुर्दैवी मृत्यू, कोल्हापूरमधील घटना

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – Kolhapur Crime News | आज राज्यात सगळीकडे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. राज्यभरात शिवजन्माचा सोहळा जल्लोषात साजरा केला जात आहे. मात्र, यादरम्यान कोल्हापूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये दोन शिवभक्तांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर तीन जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. (Kolhapur Crime News)

काय आहे संपूर्ण प्रकरण?

हाती आलेल्या माहितीनुसार, कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरील रजपूतवाडी या ठिकाणी हा भीषण अपघात झाला आहे. बाईक्सची धडक इतकी जोरदार होती की, संतोष पाटील आणि अक्षय पाडळकर या तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांच्याबरोबर असलेले तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे शिवप्रेमींकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. (Kolhapur Crime News)

कोल्हापूर शहरातील कदमवाडी इथं राहणारा संतोष बाळासाहेब पाटील आणि भोसलेवाडी इथं राहणारा अक्षय सुरेश
पाडळकर अशी या अपघातात मृत पावलेल्या तरुणांची नावे आहेत.
तर निलेश संकपाळ हा या अपघातात गंभीर जखमी झाला आहे.
जखमी झालेल्या निलेश संकपाळ याच्यावर उपचार सुरू आहेत.
या भीषण अपघाताची माहिती मिळताच मृतांच्या नातेवाईकांनी आणि मित्र मंडळींनी सीपीआर रुग्णालयात धाव घेतली.
शिवजयंती दिनी दोघांचा असा अंत झाल्याने कदमवाडी आणि भोसलेवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात शोककळा पसरली आहे.
तसेच आपली तरुण मुले गमावल्याने पाटील आणि पाडळकर कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.
या अपघाताची करवीर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Advt.

Web Title :- Kolhapur Crime News | shivjayanti 2023 two youths going to bring shivjyot died in motorbike accident on kolhapur ratnagiri highway

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics | चिन्ह आणि नाव गेल्यावर अजित पवारांचा उद्धव ठाकरेंना सल्ला, म्हणाले – ‘लवकरात लवकर…’

Prakash Raj | अभिनेता प्रकाश राज यांनी ‘द कश्मीर फाइल्स’ ला बोगस सिनेमा म्हटल्यानंतर अनुपम खेर यांनी दिले ‘हे’ सडेतोड उत्तर