Prakash Raj | अभिनेता प्रकाश राज यांनी ‘द कश्मीर फाइल्स’ ला बोगस सिनेमा म्हटल्यानंतर अनुपम खेर यांनी दिले ‘हे’ सडेतोड उत्तर

पोलीसनामा ऑनलाइन : Prakash Raj | “द कश्मीर फाइल्स” हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकत गेला होता. मात्र तरीही प्रेक्षकांनी या चित्रपटाला चांगलीच पसंती दर्शवली होती. या चित्रपटाची चर्चा आजही केली जाते. केरळ चित्रपट महोत्सवात अभिनेता प्रकाश राज यांनी या सिनेमावर भाष्य केले आहे. सध्या त्यांनी केलेले वक्त्यव्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांच्या या वक्त्यव्याला अनुपम खेर आणि दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी देखील सडेतोड उत्तर दिले आहे. (Prakash Raj)

केरळ चित्रपट महोत्सवा दरम्यान प्रकाश राजने द कश्मीर फाइल्सवर त्यांचे मत मांडले. यावेळी बोलताना ते म्हणाले, “द कश्मीर फाइल्स हा एक बोगस सिनेमा आहे. सिनेमाची निर्मिती कोणी केली याची आपल्याला कल्पना आहे. या सिनेमाचा कौतुक होणं ही खूपच गंभीर बाब आहे. या सिनेमाचे दिग्दर्शक म्हणत आहेत की आम्हाला या सिनेमाला ऑस्कर का मिळत नाही या सिनेमाला भास्कर देखील मिळणार नाही”. सध्या प्रकाश राज यांचे वक्तव्य सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. (Prakash Raj)

प्रकाश राज यांनी केलेल्या वक्तव्यानंतर अनुपम खेर यांनी त्यांना उत्तर देत म्हणाले, “लोक त्यांचे मत मांडत आहेत. काहींना आयुष्यभर खोटं बोलावं लागतं. तर काही मंडळी मात्र कायम खरे बोलतात आणि मी यापैकीच एक आहे. मला केवळ खरं बोलणं आवडतं. खरं बोलून आयुष्य जगणाऱ्या लोकांमध्ये माझी गिनती होते. खोटं बोलून आयुष्य जगणं मला आवडत नाही”.द कश्मीर फाइल्स या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी देखील प्रकाश राज यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत म्हणाले, “द कश्मीर फाइल्स नंतर अनेक लोक अस्वस्थ झाले आहेत. मला भास्कर कसा मिळेल हा तर तुमचा आहे. तो कायम तुमचाच राहील”. याआधी देखील प्रकाश राजने एका कार्यक्रमादरम्यान द काश्मीर फाइल्स या चित्रपटावर भाष्य केले होते.

द कश्मीर फाइल्स हा सिनेमा 11 मार्च 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता आणि हा सिनेमा सुपरहिट ठरला.
या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 250 कोटींचा गल्ला जमवला होता.
प्रेक्षकांनी देखील या चित्रपटाला भरभरून प्रेम दिले होते. आता प्रेक्षकांना या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची प्रतिक्षा आहे.
तर लवकरच या सिनेमाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘द कश्मीर फाइल्स अनरिपोर्टेड’ असे या सिनेमाचे नाव असणार आहे. या सिनेमाची प्रेक्षकांना आतुरता लागली आहे.

Web Title :- Prakash Raj | prakash raj calls the kashmir files bad film anupam kher reacts

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Kiran Mane | शिवजयंती निमित्त किरण मानेंनी केलेली पोस्ट चर्चेत; म्हणाले ‘सच्च्या शिवभक्ताला कुठलीबी लढाई..’

Subodh Bhave | ‘ताज: डिव्हायडेड बाय ब्लड’ या हिंदी वेब सिरीज मधील बिरबलच्या भूमिकेतील सुबोध भावे यांचा लुक व्हायरल; लुकवरून नेटकऱ्यांनी केले ट्रोल

Aurangabad Accident News | शिंदे गटाच्या आमदाराला सुरक्षा पुरवण्यासाठी जाणाऱ्या पोलीस व्हॅनचा भीषण अपघात, 5 जण जखमी