Kolhapur Crime | ‘एकत्र जगू शकत नाही, पण मरु शकतो’, अहमदनगरमधील प्रेमीयुगुलाची कोल्हापूरात आत्महत्या; प्रचंड खळबळ

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar District) एका प्रेमीयुगुलाने कोल्हापूरमध्ये (Kolhapur Crime) एका यात्रीनिवासमध्ये (धर्मशाळा) गळफास (Hanging) लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना कोल्हापूरातील (Kolhapur Crime) श्री अंबाबाई मंदिर (Shri Ambabai Temple) परिसरात असलेल्या धर्मशाळेत (Dharamshala) उघडकीस आली आहे. आत्महत्या करणारे प्रेमीयुगुल (Young Couple Suicide) अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील तामसवाडी येथील आहे.

 

राहुल विश्वास मचे Rahul Vishwas Mache (वय-25) आणि प्रियंका विकास भराडे Priyanka Vikas Bharade (वय-22 दोघे रा. तामसवाडी, ता. नेवासा) अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत. हा प्रकार सोमवारी (दि.3) सकाळी उघडकीस आला आहे. 31 डिसेंबरला रात्री या दोघांनी ओढणीने गळफास लावून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आत्महत्या करण्यापूर्वी दोघांनी चिठ्ठी लिहून (Suicide note) ठेवली आहे. पोलिसांनी ती जप्त केली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही एकाच गावचे रहीवासी आहेत. तर प्रियंकाचे तीन वर्षापूर्वी गावातील एकासोबत लग्न झाले आहे. मागील काही वर्षांपासून दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. ते दोघे 31 डिसेंबर 2021 रोजी एस.टी. बसने कोल्हापूरात आले. ते ताराबाई रोडवरील (Tarabai Road) एका यात्रीनिवासमध्ये खोली क्रमांक 6 मध्ये उतरले. शुक्रवारी सायंकाळी त्यांनी खोलीचा दरवाजा बंद केला. तो उघडला नसल्याने यात्रीनिवास मालकांना शंका आली. त्यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात (Juna Rajwada Police Station) संपर्क साधून घटनेची माहिती दिली. (Kolhapur Crime)

घटनेची माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे (Police Inspector Dattatraya Nale),
उपनिरीक्षक संदीप जाधव (PSI Sandeep Jadhav) व प्रितम पुजारी (PSI Pritam Pujari) यांनी घटनास्थळी धाव घेतली.
त्यांनी रूमचा दरवाजा तोडून काढला असता दोघा प्रेमीयुगुलांनी फॅनच्या हुकाला ओढणीने गळफास लावून आत्महत्या केल्याचे दिसून आले.

 

‘दोघे एकत्र जगू नाही, पण मरु शकतो’
आत्महत्या करण्यापूर्वी दोघांनी लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलिसांना मिळाली.
त्यामध्ये, ‘आम्हाला माफ करा, आम्ही दोघेही एकमेकांशिवाय जगू शकत नाही.
आम्ही प्रेम करतो, पण प्रेम कोणाला कळले नाही. आम्ही दोघे एकत्र जगू शकत नसलो तरी मरु मात्र शकतो.
नवीन वर्षाचा पहिला दिवसही पाहणार नाही’ असे लिहिले आहे.
तसेच चिठ्ठीत दोघांच्या नातेवाईकांची नावे आणि गावचा पत्ता, संपर्कासाठी मोबाईल क्रमांक लिहून ठेवला आहे.

 

 

Web Title :- Kolhapur Crime | young couple from ahmednagar suicide in Dharamshala of kolhapur

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी ’गुड न्यूज’, दुप्पट होऊ शकतो पगार, ‘हे’ आहे कॅलक्युलेशन

Coronavirus in Maharashtra | राज्यात ‘कोरोना’ रुग्णांचा आकडा वाढला, गेल्या 24 तासात 12,160 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Joint CP Dr Ravindra Shisve | केंद्र शासनाकडून पुण्याचे ज्वाईंट सीपी डॉ. रवींद्र शिसवेंना IG Empanelment; सह आयुक्त म्हणाले – ‘बहुमान मिळाल्यानं आनंद’