Joint CP Dr Ravindra Shisve | केंद्र शासनाकडून पुण्याचे ज्वाईंट सीपी डॉ. रवींद्र शिसवेंना IG Empanelment; सह आयुक्त म्हणाले – ‘बहुमान मिळाल्यानं आनंद’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Joint CP Dr Ravindra Shisve | पुण्याचे पोलिस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Joint CP Dr Ravindra Shisve) यांच्या IG Empanelment ला केंद्राकडून मंजूरी देण्यात आली आहे. भारतीय पोलिस सेवेत असणार्‍या खुप कमी अधिकार्‍यांना हा बहुमान मिळतो. डॉ. रवींद्र शिसवे यांची भविष्यात केंद्र शासनाच्या अखत्यारितील IG तथा IG समकक्ष पदावर (केंद्रातील सह सचिव) नियुक्ती होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भारतीय पोलीस सेवेतील 23 जणांना यंदा बहुमान मिळाला आहे. त्यात डॉ. शिसवे हे महाराष्ट्रातील एकमेव अधिकारी आहेत. आज (सोमवार) केंद्र सरकारमधील अंडर सेक्रेटरी अनजान सरकार (Anjan Sarkar, Under Secretary to The Government of India) यांनी याबाबतचे काढले आहेत.

 

डॉ. रवींद्र शिसवे (Joint CP Dr Ravindra Shisve) यांची 2019 मध्ये मुंबई (Mumbai) येथून पुण्यात (Pune) सह पोलीस आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली होती. आज त्यांना पदोन्नती मिळाली आहे. याबाबत ‘पोलीसनामा’ ऑनलाइन (www.policenama.com) सोबत बोलताना त्यांनी सांगितले की, ‘हा बहुमान मिळाल्याने आनंद झाला आहे. आगामी काळात देखील निती मुल्यांचे जतन करून समाजाची प्रमाणिकपणे सेवा आपण करत राहणार आहोत.’

 

पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Joint CP Dr Ravindra Shisve) पुढे म्हणाले, पुणे शहरातमध्ये काम करताना अनेक वेगवेगळे अनुभव येत आहेत. खासकरून कोरोनाच्या (Corona) संकट काळात काम करत असताना अनेक संघटना, संस्था यांच्या बैठका घेऊन अनेक नागरिकांना जोडता आले. कोरोना संकटाची परिस्थिती हाताळत असताना पुणेकरांनी मोलाचं सहकार्य केले असून मी त्यांचा कायमचा ऋणी राहील. दरम्यान, डॉ. शिसवे यांनी कोरोना काळात केलेल्या कामाबद्दल अनेक संस्थांकडून त्यांचा गौरव देखील करण्यात आलेला आहे. आगामी काळात देखील प्रमाणिकपणे समाजाची सेवा करत राहण्याचा त्यांचा मानस आहे.

पुण्यात काम करत असताना मला जानेवारी 2021 मध्ये ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ मिळालं, याचा मला खूप आनंद आहे.
सह पोलीस आयुक्त पदावर काम करत असताना माझ्या सोबत काम करणाऱ्या सर्व कनिष्ठ कर्मचाऱ्यापासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंतच्या सर्वांनी सहकार्य केले.
पुण्यात कार्यरत असतानाच हा बहुमान मिळाल्याने खुप आनंद झाला आहे.
ज्यावेळी माझी केंद्रातील पदावर नियुक्ती होईल त्या ठिकाणी देखील निती मुल्यांचे जतन करत प्रामाणिकपणे काम करेल असा विश्वास डॉ. रविंद्र शिसवे यांनी व्यक्त केला.

 

पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे हे 2019 मध्ये पुण्यात सह पोलीस आयुक्त म्हणून रुजू झाले होते.
पुण्यात (Pune Police) नियुक्त होण्यापूर्वी ते बृहन्मुंबई येथील संरक्षण व सुरक्षा विभागात व
त्यापूर्वी मध्य मुंबईत अपर पोलीस आयुक्त (Addl CP) म्हणून कार्यरत होते.
ते पदोन्नतीने पुण्यात बदली होऊन आले होते. यापूर्वी त्यांनी गडचिरोली, गोंदिया, सिंधुदुर्ग, बुलढाणा
आणि सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक (Superintendent of Police) म्हणून काम केले आहे.
मुंबईच्या प्रतिष्ठेच्या दक्षिण मुंबई म्हणजेच Zone-I चे पोलीस उपायुक्त (DCP) म्हणून सर्वाधिक काळ म्हणजे सुमारे चार वर्षे ते कार्यरत होते.
पुण्याचे तत्कालीन सह आयुक्त शिवाजी बोडके (Shivaji Bodke) हे सेवानिवृत्त झाल्यानंतर डॉ. रविंद्र शिसवे यांची नियुक्ती करण्यात आली होती.

 

Web Title :- Joint CP Dr Ravindra Shisve | Central Government cleared the empanelment of Joint CP Dr Ravindra Shisve and others 22 IPS officers for holding Inspector General level posts in Govt of India

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 149 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Corporator Dhiraj Ghate | चाळीत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या घरभाड्यात वाढ, पालिकेने पुनर्विचार करावा; नगरसेवक धीरज घाटेंचे आयुक्तांना निवेदन

 

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 444 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी