Kolhapur IG Office | कोल्हापूरातील ‘आयजी ऑफिस’ पुण्याला हलवण्याबबातच्या हलाचालींना वेग

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – पश्चिम महाराष्ट्राचे (Western Maharashtra) पुणे हे मुख्यालय (Pune Headquarters) आहे. पुण्यामध्ये सर्व विभागीय कार्यालयासह (Divisional Office) आयुक्तालये आहेत. त्यादृष्टीने सोयीचे व्हावे यासाठी कोल्हापूरमधील विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालय (Kolhapur IG Office) हे पुण्यात स्थलांतरीत (Migration) करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. राज्याच्या गृहविभागाने (Home Department) कोल्हापूरचे आयजी ऑफिस (Kolhapur IG Office) पुण्याला हलवण्याबबात कोल्हापूर जिल्हाधिकारी (Kolhapur Collector) यांच्यासोबत पत्र व्यवहार केला आहे.

 

पंधरा दिवसांपूर्वी राज्याच्या गृह विभागाने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाशी पत्रव्यवहार करुन त्याबाबतचा अहवाल देण्याच्या सूचना केल्या आहे. मागील 27 वर्षापासूनच कोल्हापूरातील आयजी ऑफिस (Kolhapur IG Office) पुण्याला हलविण्याचा प्रस्ताव प्रलंबित आहे.

 

कोल्हापूर, सातारा (Satara), सांगली (Sangli), पुणे ग्रामीण (Pune Rural), सोलापूर ग्रामीण (Solapur Rural) या पाच जिल्ह्यांच्या पोलीस खात्याचा कारभार या कोल्हापूर विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयातून चालतो. सर्वसामान्य नागरिकांशी तसा या कार्यालयासोबत थेट संपर्क येत नसला तरी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून तक्रारींचे निवारण न झाल्यास त्याबाबत नागरिकांना थेट आयजी कार्यालयात दाद मागता येत होती.

 

तसेच पाच जिल्ह्यातील पोलीस दलाचे प्रशासकीय कामकाज याच कार्यालयातून चालते. मात्र हे कोल्हापूरमध्ये असणे म्हणजे कोल्हापूरच्या दृष्टीने भूषणवाह बाब आहे.
पण आता हे कार्यालय पुण्यात स्थलांतरित करण्याच्या हालचाली 1955 पासून सुरु आहेत. नुकतेच गृहविभागाने अहवाल मागविल्याने या हालचालिंना वेग आला आहे.

 

म्हणून पुणे हेच ठिकाण सोयीचे
परिक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा या तीन जिल्ह्यांच्या तुलनेत पुणे ग्रामीण व सोलापूर ग्रामीण या दोन जिल्ह्यात गुन्हेगारीचा आलेख (Crime Rate) वाढत असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी भेट देणं सोयीचं व्हावं.
तसेच वरिष्ठ पातळीवरील होणाऱ्या बैठका यासाठी पुणे हेच ठिकाण सोयीचे असल्याने हे कार्यालय पुण्यात स्थलांतरीत करण्याच्या हलचाली सरु झाल्या आहेत.

बदलत्या परिस्थितीनुसार पुणे सोयीचे
महाराष्ट्र (Maharashtra) व कर्नाटक (Karnataka) या दोन्ही राज्यांच्या सीमाप्रश्नासाठी कोल्हापूरात 1965 मध्ये पाच जिल्ह्यांसाठी उपमहानिरीक्षक (DIG) कार्यालयाची स्थापना करण्यात आली होती.
त्यानंतर याचे रुपांतर विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयात करण्यात आले.
मात्र आता बदलत्या परिस्थितीनुसार हे कार्यालय पुणे येथे सोयीचे ठरणार असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

 

अहवाल तयार करण्याचे काम सुरु- जिल्हाधिकारी
याबाबत जिल्हाधिकारी राहुल रेखावार (Collector Rahul Rekhawar) यांनी सांगितले की,
विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालय पुण्यात स्थलांतरित करण्याचा तसा जुनाच प्रस्ताव आहे.
स्थलांतरित करण्याबाबत गृहखात्याने नुकताच अहवाल मागवला आहे.
त्याबाबत अभ्यास करुन अहवाल तयार करण्याचे काम सुरु असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

 

Web Title :- Kolhapur IG Office | kolhapur ig office migration movement in full swing all divisional offices to be consolidated in pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

SBI Tax Savings Scheme | SBI च्या ‘या’ स्कीममध्ये केवळ रू. 1000 पासून करा गुंतवणूक; टॅक्स सूटसह मिळतील अनेक फायदे

 

Bogus Aadhaar Card | काय सांगता ! होय, राज्यातील 19 लाख विद्यार्थ्यांचे आधारकार्ड बोगस

 

Pune Police Combing Operation | पुणे पोलिसांचे शहरात ‘ऑल आऊट कोम्बिंग ऑपरेशन’; 3059 सराईतांची केली तपासणी; 722 गुन्हेगार मिळून आले