Bogus Aadhaar Card | काय सांगता ! होय, राज्यातील 19 लाख विद्यार्थ्यांचे आधारकार्ड बोगस

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – Bogus Aadhaar Card | अलीकडच्या सर्व शासकीय अथवा निमशासकीय कामांसाठी आधार कार्ड (Aadhaar Card) अनिवार्य करण्यात आले आहे. इतकच नाही तर आधार क्रमांकावरून एखाद्या व्यक्तीची सर्व माहिती मिळू शकते. मात्र, आता मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai High Court) औरंगाबाद खंडपीठात (Aurangabad Bench High Court) एका सुनावणीदरम्यान, आधारकार्डबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. २४ लाख बोगस विद्यार्थी असल्याचा दावा करणाऱ्या याचिकेवरील सुनावणीवेळी राज्याच्या शिक्षण विभागाने (State Department of Education) १९ लाख विद्यार्थ्यांचे आधारकार्ड बोगस (Bogus Aadhaar Card) असून २९ लाखांची विनाआधारकार्ड नाेंदणी झाली असल्याची माहिती खंडपीठासमोर सादर केली आहे.

 

औरंगाबाद (Aurangabad) खंडपीठात बीड जिह्यातील (Beed District) ब्रिजमोहन मिश्रा यांनी ॲड. सचिन देशमुख (Sachin Deshmukh) यांच्यामार्फत राज्यात २४ लाख विद्यार्थी बोगस (Bogus Students) असल्याचा दावा करणारी जनहित याचिका दाखल केली होती. खासगी शाळांचे संस्था संचालक, मुख्याध्यापक आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने बोगस विद्यार्थी संख्या दाखवण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली होती. त्यानंतर खंडपीठाने ऑनलाइन (Online) पद्धतीने आधारकार्डसोबत जोडलेल्या विद्यार्थ्यांची माहिती सादर करण्याचे निर्देश राज्य सरकारला (State Government) दिले होते. त्यानुसार राज्य सरकारच्या शिक्षणविभागाने सादर केलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. (Bogus Aadhaar Card)

 

दहा वर्षांपूर्वी पटपडताळणी मोहिम राबविण्यात आली होती. त्यामध्ये २० लाख बोगस विद्यार्थी सापडले होते.
त्यामुळे बोगस विद्यार्थी संख्येला आळा घालण्यासाठी विद्यार्थ्यांची आधारकार्डद्वारे नोंदणी करण्यात आली.
मात्र, तरीही बोगस विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली नाही. विशेष म्हणजे त्यामध्ये आणखी वाढ झाल्याचे समोर आले आहे.
शिक्षण विभागाने (Department of Education) दिलेल्या माहितीनुसार राज्यात १९ लाख विद्यार्थ्यांचे आधारकार्डच बोगस असल्याचे समोर आले आहे.
तर, २९ लाख विद्यार्थ्यांची विनाआधारकार्ड नोंदणी झाली आहे.

राज्यातील विविध जिल्ह्यांत किती बोगस विद्यार्थी ?
मुंबई: ८० हजार ८००, पुणे : २ लाख ४३ हजार ५८२, नाशिक: २५३, अहमदनगर: ६०हजार ९५१, नागपूर: १ लाख ८४ हजार २६२ , जळगाव: १लाख ७२ हजार ५४३ , नांदेड: १ लाख ५२ हजार ७२३, यवतमाळ: १लाख १७ हजार ५१९, बुलडाणा: ९८ हजार ४८८ , धुळे: ८५ हजार १५७, अकोला: ५६ हजार ४७८, अमरावती: ५हजार १०७, औरंगाबाद: १० हजार ६६६ आणि बीड: ८हजार ५२८.

 

Web Title :- Bogus Aadhaar Card | 19 lakh students aadhaar card bogus in the state while 29 lakh students registration without aadhaar card

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Police Combing Operation | पुणे पोलिसांचे शहरात ‘ऑल आऊट कोम्बिंग ऑपरेशन’; 3059 सराईतांची केली तपासणी; 722 गुन्हेगार मिळून आले

 

Amol Mitkari | ‘मलिकांवर आरोप करणाऱ्या फडणवीसांनी लाड यांच्या कन्येच्या लग्नात कोणाशी हात मिळवला होता?’ – अमोल मिटकरी

 

Sarjeraodada Naik Shirala Sahakari Bank | सर्जेरावदादा नाईक शिराळा सहकारी बँकेचा परवाना रद्द, ‘या’ कारणामुळे RBI ने केली कारवाई