Kolhapur News | जिल्ह्यातील सर्व दुकाने सोमवारपासून उघडणार

कोल्हापूर न्यूज (Kolhapur News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – कोल्हापूर जिल्ह्याचा (Kolhapur district) दररोजचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट (Corona positivity rate) कमी होत आहे. तरीही ठाकरे सरकार निर्णय देण्यास विलंब लावत आहे. त्यामुळे शासनाच्या आदेशाची (Government Order) वाट न पाहता आम्ही सोमवारपासून (दि. 28) जिल्ह्यातील सर्व दुकाने सुरू करणार असल्याचे चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे ( President, Chamber of Commerce Sanjay Shete) यांनी सांगितले.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

संजय शेटे (Sanjay Shete) म्हणाले की, 4 दिवसापूर्वी जिल्ह्याच्या पॉझिटिव्हिटी रेट (Corona positivity rate) जास्त तर शहराचा कमी होता. या आधारावर शहर अन् जिल्हा असे वर्गीकरण करून शहरातील दुकाने सुरू करण्याची मागणी चेंबर ऑफ कॉमर्सने पालकमंत्री सतेज पाटील (Guardian Minister Satej Patil) यांच्याकडे केली होती. मंत्री पाटील यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्याशी चर्चा करू असे आश्वासन दिले होते.

पण दोन दिवस अद्याप कोणतीच चर्चा झाली नाही. त्यातच जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट दोन दिवसांपासून कमी आला आहे. बुधवारी सर्वाधिक 33 हजार जणांचे टेस्टिंग झाले.
जिल्ह्याचा बुधवारचा पॉझिटिव्हिटी रेट 5.12 आहे.
तर गेल्या आठवडयातील शुक्रवार ते बुधवार या सहा दिवसांचा रेट 8.05 टक्के इतका आहे.
त्यामुळे आम्ही शासनाच्या आदेशाची वाट न पाहता सेामवारपासून सर्व दुकाने उघडणार असल्याचे शेटे म्हणाले.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Titel : Kolhapur News | president of the Chamber of Commerce Sanjay Shete said All shops in Kolhapur district will be open from 28 june

हे देखील वाचा

Pimpri News | पिंपरी चिंचवड पोलिसांनी अंमली पदार्थाविरोधात जोरदार मोहिम; दोन दिवसात 8 जणांना पकडले

Health Insurance Cover | IRDA नं कंपन्यांना नवीन इन्श्युरन्स प्रॉडक्ट आणण्यास सांगितलं, घरात होणार्‍या उपचारांचा सुद्धा ‘विमा’

Pune Ambil Odha Slum । आंबिल ओढा परिसरात पोलिस अन् स्थानिक रहिवाशांमध्ये राडा, अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न

Gold Price Today | खुशखबर ! आज स्वस्त झाले सोने, येथे चेक करा किती घसरले रेट?

Atal Pension Yojana | मोदी सरकारच्या ‘या’ योजनेत दर महिना मिळतील 5000 रुपये, जाणून घ्या कसा घ्यायचा लाभ