Kolhapur News । कोल्हापूर जिल्ह्यात 27 जूनपर्यंत निर्बंध कायम राहणार

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – अनेक जिल्ह्यात कोरोना (covid) रुग्णाच्या संख्येत घट झाल्याने तेथील व्यवहारही सुरळीत सुरु झाले आहेत. परंतु, कोल्हापूर (Kolhapur News) जिल्ह्यातील परिस्थिती मात्र अद्याप चिंताजनक पाहायला मिळत आहे. जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्हिटी दर (Positivity rate) आणि प्राणवायू बेडची व्यापलेली संख्या याचे प्रमाण या आठवड्यात देखील कमी झाले नाहीत. म्हणून कोल्हापूर जिल्हा चौथ्या श्रेणीतच राहिला आहे. यामुळे आता 27 जूनपर्यंत निर्बंध (Restrictions) कायम राहणार आहे. यासंदर्भातचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांच्या (Collector Kolhapur) उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत होणार आहे. (Restrictions will remain in place till June 27 in Kolhapur district)

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

कोल्हापूर (Kolhapur News) जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती वाढतीच आहे. तसेच शहरापेक्षा ग्रामीण भागात बाधित रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. काही गावामध्ये कोरोनाचा उद्रेक दिसून येत आहे. जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी दर (Positivity rate) वाढत असल्यामुळे जिल्हा प्रशासन (District Administration) चिंतेत पडलं आहे. या सर्व परिस्थिती वरून कोल्हापूर जिल्ह्यातील निर्बंध पुढील आठवड्यातही अर्थात 21 जून ते 27 जून अखेरपर्यंत लागू राहण्याची शक्यता आहे.

Anna Hazare and Jitendra Awhad । जितेंद्र आव्हाडांनी दिलेल्या शुभेच्छांवरून अण्णा हजारेंनी दिलं सणसणीत उत्तर; म्हणाले…

मागील काही दिवसापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी कोरोना पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेतली.
त्यावेळी कोल्हापुरात गरज पडल्यास आणखी कडक निर्बंध करणार आहे.
येथील निर्बंध अजिबात शिथिल करणार नाही, असे देखील संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिले होते.
दरम्यान, जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्येत चढ-उतार कायम आहे.
मात्र, घट होत नाही. गुरुवारी 1383 नवे रुग्ण सापडले.
तर 1410 जण कोरोनामुक्त झाले. तर बाधित 39 जणांनी आपला प्राण गमावला.
कोल्हापूर शहरातील 337 जणांना संसर्ग झाला आहे. यामुळे सक्रिय रुग्णांचा (Active patients) आकडा 11,361 पर्यंत आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

Web title : Kolhapur News restrictions will remain in force till june 27 in kolhapur district

हे देखील वाचा

PM Narendra Modi | लोकप्रियतेत पीएम नरेंद्र मोदीच सर्वोत्कृष्ट नेते; जो बायडन यांच्यासह 13 जागतिक नेत्यांना टाकलं मागे

धक्कादायक ! गुजरातच्या साबरमती नदीत सापडला कोविड-19 व्हायरस, तपासणीत सर्व नमुने आढळले संक्रमित