Koregaon Bhima Case | कोरेगाव भीमा दंगल प्रकरणासंदर्भात विश्वास नांगरे पाटील यांना चौकशीसाठी बोलवणार? पुराव्याचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आयोगाचे आदेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Koregaon Bhima Case | कोरेगाव भीमा येथील दंगल प्रकरणी तत्कालीन कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक (Kolhapur Range Inspector General) विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangre Patil) यांना चौकशीसाठी (Inquiry) बोलवण्यात असल्याची माहिती समोर येत आहे. विश्वास नांगरे पाटील यांना चौकशीसाठी बोलावण्यात यावे यासाठी अ‍ॅड. आशिष सातपुते (Adv. Ashish Satpute) यांनी आज आयोगाकडे (Koregaon Bhima Case) अर्ज केला होता. यावर आयोगाने (Commission) आदेश काढला असून नांगरे पाटील यांनी त्यांचे पुराव्याचे प्रतिज्ञापत्र (Affidavit of Evidence) द्यावे असे आदेश आयोगाने दिल्याची माहिती विशेष सरकारी वकील अ‍ॅड. शिशिर हिरे (Special Public Prosecutor Adv. Shishir Hire) यांनी दिली.

 

1 जानेवारी 2018 रोजी विजयस्तंभ जवळ असलेल्या कोरेगाव भीमा (Koregaon Bhima Case) याठिकाणी दोन समुहात दंगल (Riot) झाली होती. त्यावेळी विश्वास नांगरे पाटील हे तत्कालीन कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे पोलीस महानिरीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यामुळे त्यांना चौकशीसाठी कोरेगाव भीमा आयोग (Koregaon Bhima Commission) बोलवणार आहे. त्यांची चौकशी कामी साक्ष नोंदवण्यासाठी आयोगासमोर अ‍ॅड. आशिष सातपुते यांनी अर्ज केला आहे. आयोगाची पुढील कामकाज मुंबई येथे 21 ते 25 फेब्रुवारी दरम्यान सुरु होणार आहे, असेही अ‍ॅड. हिरे यांनी सांगितले.

 

पुण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त (Ex Pune CP) रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांच्या चौकशी संदर्भात विचारले असता अ‍ॅड. शिशिर हिरे यांनी सांगितले की, रश्मी शुक्ला या चौकशीसाठी हजर झाल्या होत्या. रश्मी शुक्ला यांनी चौकशीत त्यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिली आहेत. त्यांनी त्यांचे पुराव्याचे प्रतिज्ञापत्र सुस्पष्टपणे दिले आहे. 1 जानेवारीच्या घटनेनंतर पुणे शहरात कोणतीही घटना घडली नाही. तसेच कोणताही कायदा सुव्यवस्थेचा (Law and Order) प्रश्न निर्माण झाला नाही. अशी साक्ष त्यांनी दिली आहे.

दरम्यान, 2018 मध्ये झालेल्य हिंसाचारानंतर राज्य सरकारने (State Government)
या प्रकरणी कोलकाता हाय कोर्टाचे (Kolkata High Court) निवृत्त मुख्य न्यायाधीश जे.एन. पटेल (Retired Chief Justice J.N. Patel)
यांच्या अध्यक्षतेखाली आणि महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव (Former Chief Secretary of Maharashtra)
सुमित मलिक (Sumit Malik) यांच्या नेतृत्वाखाली चौकशी आयोग नेमला आहे. या आयोगाकडून आज रश्मी शुक्ला यांची साक्ष नोंदवण्यात आली.

 

Web Title :- Koregaon Bhima Case | koregaon bhima case IPS vishwas nangre patil will call for questioning? Commission orders submission of affidavit of evidence

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Corporation Employees | पुणे महापालिकेतील समाविष्ट 23 गावांतील 46 ‘बोगस’ कर्मचारी ‘बडतर्फ’; सर्वाधिक बोगस भरती बावधन बु. आणि नर्‍हे ग्राम पंचायतीमध्ये झाल्याचे उघड

 

Urfi Javed Family | उर्फी जावेद सारख्याच सुंदर आहेत तिच्या बहिणी, इंन्टाग्रामवर फोटो शेअर करून फॅमिलीची करून दिली ओळख

 

Pune Smart City Project | स्मार्ट सिटीच्या बेफिकिरी मुळे नागरिकांना भुर्दंड! सत्ताधारी भाजप नगरसेविकेचा घरचा आहेर