Koregaon Bhima Violence Case | IPS अधिकारी परामबीर सिंग आणि रश्मी शुक्ला यांना समन्स बजावण्याचे कोरेगाव भीमा चौकशी आयोगाचे आदेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन कोरेगाव भीमा हिंचासाचार प्रकरणात (Koregaon Bhima Violence Case) चौकशीसाठी राज्य सरकारने नेमलेल्या आयोगाच्या कामजाला सुरुवात झाली आहे. कोरेगाव भीमी हिंसाचार प्रकरणामध्ये (Koregaon Bhima Violence Case) तत्कालीन अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) परमबीर सिंह (ADG (L & O) Parambir Singh) आणि तत्कालीन पुण्याचे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला (IPS Rashmi Shukla) यांची साक्ष महत्त्वाची असल्याने त्यांना समन्स बजावण्याचे आदेश कोरेगाव भीमा चौकशी आयोगाने (Inquiry Commission) दिले असल्याची माहिती आयोगाचे वकील आशिष सातपुते यांनी दिली

 

आयोगाचे वकील आशिष सातपुते (Lawyer Ashish Satpute) यांनी या संदर्भात अर्ज केला होता.
कोरेगाव भीमा हिंसाचार (Koregaon Bhima Violence Case) घडला त्यावेळी परमबिर सिंह हे अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) व रश्मी शुक्ला हे पुणे पोलीस आयुक्त होते. हिंसाचाराच्या घटनेच्या अनुषंगाने त्यांच्याकडील इंटेलिजन्स इनपुट (Intelligence input) व इतर माहिती महत्वाची असल्याने, त्यांची साक्ष आवश्यक असल्याचे आशिष सातपुते यांनी म्हटले. सातपुते यांचा अर्ज मंजूर करताना आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती जे एन पटेल (Justice J. N. Patel) यांनी परामबीर आणि रश्मी शुक्ला याना समन्स जारी करण्याचे आदेश दिले आहेत.

1 जानेवारी 2018 रोजी पुण्यातील भीमा कोरेगाव येथे हिंसाचार झाला होता. त्यात एकाचा मृत्यू झाला होता तर 10 पोलिसांसह अनेक जण जखमी झाले होते.
पुण्यात भरवण्यात आलेली एल्गार परिषद व त्यातील चिथावणीखोर भाषणांमुळे कोरेगाव भीमी हिंसाचार उसळल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.
त्या प्रकरणी अनेक जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
या घटनेची चौकशी करण्याची मागणी करण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी हा आयोग नेमला.

 

Web Title : Koregaon Bhima Violence Case | summons to rashmi shukla and parambir singh in bhima koregaon case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | पुण्याच्या विश्रांतवाडी परिसरात काकानेच केले भाचीसोबत अश्लिल चाळे, विनयभंगाचा गुन्हा दाखल

Fixed Deposit | बँकेत FD करण्याचा विचार करत असाल तर ‘या’ 4 गोष्टी लक्षात ठेवा, होईल जास्त फायदा

Ananya Pandey Chat With Aryan Khan | आर्यन खानने अनन्या पांडेकडून मागवला होता गांजा? NCB सोर्सचा दावा, चॅटमध्ये लिहिले होते – ‘व्यवस्था करेन’