Ananya Pandey Chat With Aryan Khan | आर्यन खानने अनन्या पांडेकडून मागवला होता गांजा? NCB सोर्सचा दावा, चॅटमध्ये लिहिले होते – ‘व्यवस्था करेन’

मुंबई : Ananya Pandey Chat With Aryan Khan | मुंबई क्रुझ ड्रग्ज प्रकरणात (Mumbai cruise drugs case) आता अनन्या पांडेच्या समस्या वाढताना दिसत आहेत. प्रकरणात अटक आर्यन खान आणि अनन्या पांडे (Ananya Pandey Chat With Aryan Khan) यांच्यातील व्हॉट्सअप चॅट (WhatsApp chat) चा आधार घेत एनसीबी (NCB) अनन्याची चौकशी करत आहे. गुरुवारी सुमारे दोन तास अनन्याची चौकशी करण्यात आली, तसेच तिला शुक्रवारी सुद्धा एनसीबी कार्यालयात बोलावण्यात आले आहे.

एनसीबी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चॅटमध्ये आर्यनने अनन्याला गांजाची व्यवस्था करण्यास सांगितले होते. उत्तरादाखल अनन्याने म्हटले होते की, गरज पडल्यास व्यवस्था करेन. असाही रिपोर्ट आहे की, आर्यन आणि अनन्यामध्ये ड्रग्जबाबत सतत चॅट सुरू होते. मात्र, वृत्त असेही आहे की, जेव्हा अनन्याला चॅटबाबत विचारण्यात आले तेव्हा तिने उत्तर (Ananya Pandey Chat With Aryan Khan) दिले की, ही केवळ थट्टा होती.

Mutual Fund Investment | ‘या’ 5 म्युच्युअल फंडने 1 वर्षात दिला 118% रिटर्न, तुम्ही सुद्धा केली आहे का गुंतवणूक?

अरेंज करण्याबाबत म्हणाली

आर्यन आणि अनन्या यांच्यातील जे व्हॉट्सअप चॅट एनसीबीला मिळाले आहे त्यानंतर तपास यंत्रणा अ‍ॅक्शनमध्ये आहे.
इंडिया टुडेने आपल्या एका रिपोर्टमध्ये सांगितले की, एनसीबी सूत्रांच्या संदर्भाने समजले आहे की,
आर्यनने अनन्याला गांजा आणण्याबाबत चर्चा केली होती यावर अनन्याने म्हटले होते की, ती व्यवस्था करेन.

सूत्रांनुसार, अनन्याची चौकशी करताना एनसीबीने तिला आर्यन खानसोबतचे चॅट दाखवले ज्यामध्ये तिने ड्रग्जची व्यवस्था करण्याचे म्हटले होते.
अनन्याने लिहिले होते – ‘मी व्यवस्था करेन (I will raise).‘

अनन्याने मस्करी केल्याचे सांगितले

रिपोर्टनुसार, जेव्हा एनसीबीेने अनन्याला याबाबत विचारले तेव्हा तिने सांगितले की, ती आर्यनची मस्करी करत होती.
तपास यंत्रणा सूत्रांचा दावा आहे की, अनन्या आणि आर्यन सतत ड्रग्जबाबत चॅट करत होते.
मात्र, प्रत्यक्षात तीने आर्यनसाठी गांजाची व्यवस्था केली होती किंवा नाही याचे कोणतेही पुरावे मिळालेले (Ananya Pandey Chat With Aryan Khan) नाहीत.

हे देखील वाचा

Ajit Pawar | अजित पवार म्हणाले – ‘साखर कारखान्यासंदर्भात खोटी आकडेवारी देऊन आरोप’

Petrol Diesel Price Today | देशात पहिल्यांदा पेट्रोल पोहचले 120 रुपये लीटरवर; List मध्ये जाणून घ्या कोणत्या शहरात आहे सर्वात महाग इंधन

 

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Ananya Pandey Chat With Aryan Khan | drugs case ananya pandey chat with aryan khan wrote about arranging ganja as per reports

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update