कोथळे खून प्रकरण : कामटेसह संशयितांवर दहा आरोप प्रस्तावित : अ‍ॅड. उज्ज्वल निकम 

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – अनिकेत कोथळे खून प्रकरणाची सुनावणी येथील जिल्हा न्यायालयात सुरू आहे. मंगळवारी न्यायालयात बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक कामटेसह सहा संशयित आणि कामटेचा मामेसासरा बाळासाहेब कांबळे यांच्याविरोधात एकूण दहा आरोप प्रस्तावित करण्यात आले आहेत, अशी माहिती विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c55287c6-d14c-11e8-9b5c-6385286c2cb5′]

दि. ११ सप्टेंबरनंतर थेट मंगळवारी सुनावणी झाली. यावेळी बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे, अनिल लाड, अरूण टोणे, नसिरूद्दीन मुल्ला, राहुल शिंगटे, झिरो पोलिस झाकीर पट्टेवाले यांच्यावर एकूण दहा आरोप प्रस्तावित करण्यात आले आहेत. यामध्ये कामटेच्या मामेसासर्‍यावरही आरोप प्रस्तावित करण्यात आले आहेत.

अनैतिक संबंधाच्या कारणावरुन तरुणाचा खून

प्रस्तावित केलेल्या पहिल्या आरोपामध्ये कामटेसह सर्व पोलिस, झिरो पोलिस झाकीर पट्टेवाले, कामटेचा मामेसासरा बाळासाहेब कांबळे या सर्वांनी अनिकेतच्या खुनाचा कट केला. त्यांनी केलेल्या कटानुसार अनिकेत आणि अमोल भंडारेला अटक केली. अनिकेतकडून अन्य गुन्हे जबरदस्तीने कबूल करून घेण्यासाठी मारहाण करून खून केला. या गुन्ह्यात शिक्षा होणार असल्याचे माहीत असूनही कट रचून खोटी माहिती दिली तसेच संगनमत केले असे म्हटले आहे.

[amazon_link asins=’B0745BNFYV’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’cd138bfb-d14c-11e8-8d12-935ec4bda3be’]

दुसर्‍या प्रस्तावित आरोपात कामटेसह सर्व पोलिस, पट्टेवाले यांनी खून केला. त्यासाठी संगनमत केले असे म्हटले आहे. तिसर्‍या आरोपात कामटे, सर्व पोलिस, पट्टेवाले व कामटेचा मामेसासरा कांबळे यांनी कटानुसार दि. 7 नोव्हेंबर रोजी आंबोलीतील महादेवगड येथे अनिकेतचा मृतदेह जाळला. त्यानंतर या गुन्ह्यात शिक्षा होणार याची त्यांना कल्पना होती. तरीही त्यांनी पुरावा नष्ट केला तसेच हे कृत्य संगनमताने केल्याचे म्हटले आहे.

‘फुकटचं दिलं म्हणजे अच्छे दिन आले का ?’ : नरेंद्र मोदींचे भाऊ

चौथ्या आरोपात कामटेसह संशयितांनी रचलेल्या कटानुसार अनिकेत कोथळेकडून अन्य गुन्हे कबुलीसाठी त्याला मारहाण करून गंभीर दुखापती केल्या. यामध्येही सर्वच संशयितांनी संगनमत केल्याचे म्हटले आहे. पाचव्या आरोपात कामटेसह त्याच्या साथीदारांनी केलेल्या गुन्ह्याची माहिती वरीष्ठ अधिकार्‍यांना देणे भाग होते. मात्र त्यांनी ती माहिती लपवली. यातही सर्वांनीच संगनमत केले असे म्हटले आहे. सहाव्या गुन्ह्यात कामटेसह सर्व संशयितांनी कटानुसार अनिकेत कोथळेचा खून केलेला असतानाही तो पळून गेला अशी खोटी माहिती दिली. त्यातही सर्वांचे संगनमत होते, असे म्हटले आहे.

[amazon_link asins=’B07B6G2VHN,B07B4S1GLV’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d5f1724c-d14c-11e8-aa27-97e5e558d5f9′]

सातव्या आरोपामध्ये अनिकेतचा मित्र अमोल भंडारे या गुन्ह्यात साक्षीदार आहे. त्यालाही बेदम मारहाण करून दुखापती केल्या असे म्हटले आहे. तर आठव्या आरोपामध्ये कामटेसह सर्व संशयितांनी संगनमताने, हेतुपुरस्सर अनिकेतचा शारिरिक छळ केला. त्याचा अपमान केला. तसेच शांतता बिघडवल्याचे म्हटले आहे. नवव्या आरोपात यातील मुख्य साक्षीदार अमोल भंडारे याला पिस्तूलाचा धाक दाखवून दमदाटी केल्याचे म्हटले आहे. तर दहाव्या आरोपात बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे, पोलिस हवालदार अनिल लाड, अरूण टोणे यांनी सीसीटीव्हीचा डीव्हीआर हा मुख्य पुरावा असताना तो नष्ट केला आहे. तिघांनीही संगनमताने हे कृत्य केल्याचेही म्हटले आहे.

सरकारी पक्षातर्फे कामटेसह सर्वच संशयितांविरोधात दहा आरोप न्यायालयात प्रस्तावित करण्यात आले आहेत. त्यावर आता पुढील महिन्यात सुनावणी होणार असल्याचेही अ‍ॅड. निकम यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

[amazon_link asins=’B074ZF7PVZ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e1625e10-d14c-11e8-bcab-cb791bb859c3′]

प्रस्तावित आरोप
कामटेसह सर्व संशयितांनी अनिकेतच्या खुनाचा कट रचला, कटानुसार अटक केली, गुन्ह्यांच्या कबुलीसाठी मारहाण केली. खोटी माहिती दिली.

 सर्व संशयितांनी रचलेल्या कटानुसार अनिकेत कोथळेचा खून केला. 
 संशयितांनी कटानुसार आंबोली येथे मृतदेह नेऊन जाळला. पुरावा नष्ट केला.  
 संशयितांनी कटानुसार गुन्हे कबुलीसाठी गंभीर दुखापती केल्या.
 केलेल्या गुन्ह्याची माहिती लपवली.
 कटानुसार खून केल्यानंतर अनिकेत पळून गेल्याची खोटी माहिती दिली.
 साक्षीदार अमोल भंडारेला गंभीर दुखापती केल्या. 
 संगनमताने, हेतुपुरस्सर शारिरिक छळ, अपमान केला, शांतता बिघडवली.
 अमोल भंडारेला पिस्तुलाचा धाक दाखवून दमदाटी केली. 
 कामटे, लाड, टोणे यांनी डीव्हीआर नष्ट करून पुरावा नष्ट केला.