Koyna Dam | कोयना धरणक्षेत्रात पावसाचा जोर कायम; महाबळेश्‍वरात 94 मिलिमीटर पावसाची नोंद

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – Koyna Dam | जून महिन्याच्या सुरूवातीपासून पावसाने (Monsoon Update) दडी मारली होती. त्यामुळे राज्यात अनेक भागात म्हणावा तसा पाऊस झाला नाही. दि. 24 जूननंतर पावसाचा जोर वाढला असल्याचे दिसत आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील (Western Maharashtra) कोयनासह (Koyna Dam) अनेक धरणांच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याचे दिसत आहे.

कोयना धरण (Koyna Dam) पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून तालुक्याच्या पूर्व भागात घट झाली आहे. पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस (Heavy Rain) असला तरी पूर्वेकडे तो कमी होत आहे. पश्चिम भागात भात व नाचणी पुनर्लागणीअगोदर मशागतीची कामे करण्यात शेतकरी (Farmer) व्यस्त आहे. पूर्व भागात कधी उघडीप तर कधी दमदार पावसाच्या सरी येत आहेत.

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासांत कोयनानगर ( Koynanagar) व नवजाला (Navjala)
56 मिलिमीटर व महाबळेश्‍वरला (Mahabaleshwar) 94 मिलिमीटर (94 mm) पावसाची नोंद झाली आहे.
कोयना धरणाची पाणीपातळी 2019.10 फूट झाली असून, पाणीसाठ्यात संथ गतीने वाढ होत असून, धरणाचा एकूण पाणीसाठा 10.95 टीएमसी झाला आहे. धरणाच्या पाण्याने तळ गाठल्याने 22 जून रोजी पायथा वीज गृहातून होणारा एक हजार 50 क्यूसेस विसर्ग बंद करण्यात आला होता. तो पुन्हा सुरू करण्यात आला असून, कोयना नदीपात्रात एक हजार 50 क्यूसेस पाण्याचा विसर्ग होत आहे.

Web Title :  Koyna Dam | monsoon update heavy rains continue in koyna dam area mahabaleshwar koynanagar Dam

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा