Koyta Gang In Pimpri Chinchwad | पिंपरी चिंचवडमध्ये कोयता गँगची दहशत, टोळक्याकडून वाहनाची व दुकानाची तोडफोड; चार जणांना अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Koyta Gang In Pimpri Chinchwad | काठ्या व कोयत्याने परिसरात दहशत निर्माण करत टोळक्याने चारचाकी गाडीची व दुकानाची तोडफोड करत मेडीकल चालकास मारहाण केली. तसेच गल्ल्यातील रोख रक्कम चोरुन नेली. ही घटना सोमवारी (दि.15) भोसरी येथील महात्मा फुले नगर (Mahatma Phule Nagar Bhosari) येथे रात्री अकराच्या सुमारास घडली.

याप्रकरणी धिरज राजीव कांदे (वय 29 रा. अजमेरा हौसिंग सोसायटी, पिंपरी मुळ रा. मु.पो. बोरगाव खु, ता. बार्शी जि. सोलापूर) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून पोलिसांनी मुआज फिरोज मुजावर (वय 19 रा. भोसरी), जावेद इब्राहीम जावळे (वय-19), अजय नागेश कांबळे (वय 19), चेतन महेंद्र मनोहर (वय 19 सर्व रा. भोसरी) यांच्यावर आयपीसी 394, 34, आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायदा, क्रिमीनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे महात्मा फुलेनगर येथे विर नावाचे मेडीकल दुकान आहे.
सोमवारी रात्री अकराच्या सुमारास धिरज कांदे हे त्यांच्या मेडीकलमध्ये काम करत होते.
त्यावेळी आरोपी हातात काठ्या व कोयते घेऊन मेडीकलसमोर आले.
त्यांनी मेडिकल समोर उभी असलेल्या सॅन्ट्रो कारच्या काचा कोयत्याने फोडून गाडीचे नुकसान केले.
तसेच मेडिकलमध्ये शिरुन फिर्यादी यांना कोयत्याचा धाक दाखवून काठीने मारहाण केली.
तसेच मेडिकलच्या काऊंटर मध्ये ठेवलेले दीड हजार रुपये चोरून नेले.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस.बी. इंगळे (PSI SB Ingle) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Attack On Police Officer In Pune | पुण्यात पोलिसांवरील हल्ले सुरूच; भांडण सोडवणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला कानशिलात लगावली

Pune Estate Broker Arrested On Mumbai Airport | मुंबई विमानतळावर BMW कारमध्ये सापडले US बनावटीचे पिस्तूल अन् काडतुसे, पुण्यातील रिअल इस्टेट ब्रोकर तुषार काळे, सचिन पोटे, आकाश शिंदेला अटक

Shewalwadi Pune Firing Case | पुणे हादरलं, सलग दुसऱ्या दिवशी गोळीबार; ‘सिक्युरिटी एजन्सी’च्या वादातून गोळीबार