Shewalwadi Pune Firing Case | पुणे हादरलं, सलग दुसऱ्या दिवशी गोळीबार; ‘सिक्युरिटी एजन्सी’च्या वादातून गोळीबार

व्यावसायिक वादातून शेवाळवाडीत एका माजी सैनिकाने दुसऱ्या माजी सैनिकावर झाडली गोळी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Shewalwadi Pune Firing Case | पुण्यात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चालल्यामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. काल (मंगळवारी) दुपारी जंगली महाराज रोडवर (JM Road Pune) एका बांधकाम व्यावसायिकावर गोळीबाराचा प्रयत्न झाला (Firing On Builder). त्यानंतर आज बुधवारी (दि.17) पुन्हा एक गोळीबाराची घटना समोर आली आहे. पुण्यातील हडपसर परिसरात (Hadapsar) ‘सिक्युरिटी एजन्सी’च्या (Security Agency) वादातून गोळीबारीची ही घटना घडली. बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास हडपसरच्या शेवाळवाडीत हा प्रकार घडला असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

जयवंत खलाटे (वय 53, रा. भेकराईनगर, हडपसर) असे जखमी झालेल्या माजी सैनिकाचे नाव आहे. याप्रकरणी सुधीर रामचंद्र शेडगे (वय 53, रा. गोंधळेनगर, हडपसर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून त्याच्या मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. (Hadapsar Police Station)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी जयवंत खलाटे यांची ‘डेल्टा वन ५ सिक्युरिटी’ नावाने सुरक्षा एजन्सी आहे. तर, शेडगे याची ‘फस्ट डिफेन्स सिक्युरिटी’ नावाने सुरक्षा एजन्सी आहे. दोघांच्या एजन्सी मार्फत हडपसर परिसरात विशेषत: शेवाळवाडी परिसरात असलेल्या विविध कंपन्या, सोसायटी तसेच खासगी आस्थापना यांना सुरक्षारक्षक पुरवण्याचे काम केले जाते. दोन्ही एजन्सीकडून शेवाळवाडी परिसरात सुरक्षा रक्षक दिले जातात. एकाच भागात काम करत असल्याने एकमेकांचे सुरक्षारक्षक पळवण्यावरुन दोघांमध्ये वाद होता.

सिक्युरिटी एजन्सीला लागणारे सुरक्षा रक्षक पळवण्याच्या आणि एकाच भागातील काम घेण्याच्या वादामधून बुधवारी सकाळी त्यांच्यामध्ये पुन्हा वाद झाला.
शेडगे आणि खलाटे हे दोघे शेवाळवाडी येथील टकले बंगला परिसरात भेटले. त्यांठीकाणी त्यांच्यात शाब्दिक वाद सुरु झाला.
हा वाद विकोपाला गेल्याने शेडगे याने त्याच्याकडे असलेल्या पिस्तुलातून खलाटे यांच्या पायावर गोळी झाडली.
यात गोळी खलाटे यांच्या पायाला लागली.
या घटनेची माहिती नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्ष (Pune Police Control Room) आणि पोलीस ठाण्यात फोन करुन दिली.

घटनेची माहिती मिळताच हडपसर पोलीस ठाण्याचे व गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
दरम्यान, जखमी खलाटे यांना रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांच्यावर उपचार करून घरी सोडण्यात आले आहे.
त्यांची प्रकृती स्थीर असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही छर्ऱ्याची बंदूक असावी असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
मात्र, पोलीस सर्व बाजूंनी तपास करीत आहेत. घटनास्थळावर मिळालेले पुरावे न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठविण्यात
आले आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NIBM Road Kondhwa Crime | पुणे : गाडीला धक्का लागल्याच्या कारणावरुन दोन गटात राडा, पोलीस अधिकाऱ्याचा महागडा मोबाईल फोडला

Rohit Pawar On Ajit Pawar | रोहित पवारांचा अजितदादांवर पुन्हा घणाघात, ”ते सत्तेशिवाय राहू शकत नाहीत, 2019 पासून भाजपसोबत जाण्याचं प्लॅनिंग”

Sharad Pawar On Datta Bharne | शरद पवारांची दत्ता भरणेंवर सडकून टीका, ”इथं एकाला निवडून आणलं, तिकीट दिलं, मंत्री केलं, पण…”