Attack On Police Officer In Pune | पुण्यात पोलिसांवरील हल्ले सुरूच; भांडण सोडवणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला कानशिलात लगावली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Attack On Police Officer In Pune | मागील काही दिवसांपासून पुण्यात पोलिसांवरील हल्ल्यांची संख्या वाढताना दिसत आहे. दोन दिवसांपूर्वी येरवडा परिसरात एका व्यक्तीने पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केली होती (Yerawada Police). त्यानंतर आता हडपसर परिसरात ही असाच प्रकार घडला आहे. भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याला कानशिलात लगावून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक केली आहे.(Attack On Police Officer In Pune)

आदिल मुख्तार शेख Adil Mukhtar Shaikh (रा. रेल्वेगेट शेजारी, काळेपडळ, हडपसर) याच्यावर आयपीसी 353, 353,
352, 506 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. याबाबत पोलीस शिपाई गणपत सुभाष भिसे (वय-30) यांनी
हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि पोलीस शिपाई गुरव असे दोघेजण तुकाई मार्शलवर सरकारी
कर्तव्य बजावित होते. त्यावेळी जनसेवा कॉलनी येथे आरोपी हा इतर मुलांसोबत भांडण करत असल्याचे दिसले.
त्यामुळे फिर्यादी व त्यांचे सहकारी त्याठिकाणी गेले.
फिर्यादी यांनी आरोपी आदिल शेख याला हटकले व तेथून जाण्यास सांगितले.
याचा राग आल्याने आरोपीने फिर्यादी गणपत भिसे यांच्या कानशिलात लगावून अंगावर धावून आला.
त्याने फिर्यादीसोबत झटापट करुन फिर्यादी यांच्या अंगावर असलेल्या शासकीय गणवेशाची बटणे तोडली.
तसेच ‘वाट लावुन टाकीन’ अशी देऊन सरकारी कामात अडथळा निर्माण केला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NIBM Road Kondhwa Crime | पुणे : गाडीला धक्का लागल्याच्या कारणावरुन दोन गटात राडा, पोलीस अधिकाऱ्याचा महागडा मोबाईल फोडला

Rohit Pawar On Ajit Pawar | रोहित पवारांचा अजितदादांवर पुन्हा घणाघात, ”ते सत्तेशिवाय राहू शकत नाहीत, 2019 पासून भाजपसोबत जाण्याचं प्लॅनिंग”

Sharad Pawar On Datta Bharne | शरद पवारांची दत्ता भरणेंवर सडकून टीका, ”इथं एकाला निवडून आणलं, तिकीट दिलं, मंत्री केलं, पण…”