Kranti Redkar | क्रांती रेडकरची ‘ती’ पोस्ट चर्चेत; म्हणाली “लॅम्बोर्गिनी आणि फेरारी असणे म्हणजे प्रेम नाही…… “

पोलीसनामा ऑनलाइन टीम – अभिनेत्री क्रांती रेडकर (Kranti Redkar) म्हटले की, कोंबडी पळाली या गाण्याची आठवण प्रेक्षकांना नक्कीच होते. तिने या गाण्यावर सर्वांना थिरकायला लावले होते. क्रांती (Kranti Redkar) सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. ती तिच्या शूट वरील फोटो, व्हिडिओज नेहमीच चाहत्यांसाठी शेअर करत असते. सध्या क्रांतीची अशीच एक पोस्ट प्रेक्षकांना फारच आवडल्याचे दिसत आहे.

 

क्रांती रेडकर सध्या एका शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या वेळेचे काही फोटोज ती सोशल मीडियावर शेअर करून याची माहिती वेळोवेळी प्रेक्षकांना देत असते, तर आता तिने पती समीर वानखेडेसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे आणि त्याला सुंदर असे कॅप्शनदेखील दिले आहे. जे सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनत आहे.

क्रांतीने (Kranti Redkar) समीर सोबत एक फोटो शेअर करत म्हटले की, “जेव्हा तो तुमच्या सेटवर अचानक तुम्हाला भेटायला येतो तेव्हा…… धन्यवाद समीर वानखेडे माझ्यासाठी ही खूप खास आणि महत्त्वाची गोष्ट आहे…… लॅम्बोर्गिनी आणि फेरारी असणे म्हणजे प्रेम नाही तर माझ्यासाठी हेच खरे प्रेम आहे”.
सध्या क्रांतीची ही पोस्ट सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
याआधी समीर वानखेडे यांनी अभिनेता शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरण्यात अटक केले होते.
त्यानंतर त्यांच्यावर अनेक आरोप-प्रत्यारोप करण्यात आले, तर समीर वानखेडे हे लाचखोरीच्या आरोपामुळेदेखील वादाच्या भोवऱ्यात अडकले होते.
मात्र, प्रत्येक प्रसंगी ते खंबीरपणे उभे होते आणि या अशा प्रत्येक वेळेस त्यांना क्रांतीने कायम खंबीर पाठिंबा दिला.

 

Web Title :- Kranti Redkar | marathi actress kranti redkar share special post for husband sameer wankhede talk about love

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pimpri Chinchwad Police | चंद्रकांत पाटलांच्या शाईफेक प्रकरणानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना केले ‘या’ विभागाशी संलग्न

IND Vs BAN Test | बांगलादेशविरुद्ध पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर

Pimpri Chinchwad Fire News | पिंपरी-चिंचवडमधील सोसायटीत शॉर्ट सर्किट; चार्जिंगला लावलेल्या 15 इलेक्ट्रिक गाड्या जळून खाक

Pune Crime | पत्नी अन् तिच्या कुटुंबाच्या त्रासाला वैतागून पतीची आत्महत्या; पत्नीसह चौघांवर FIR; मुंढवा परिसरातील घटना