Pune Crime | पत्नी अन् तिच्या कुटुंबाच्या त्रासाला वैतागून पतीची आत्महत्या; पत्नीसह चौघांवर FIR; मुंढवा परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | बेंगलोर येथे फ्लॅट घेण्यासाठी पत्नी आणि तिच्या कुटुंबीयांनी शिवीगाळ करत मारहाण करून मानसिक त्रास (Mental Distress) दिल्याने पतीने आत्महत्या (Suicide) केली. याप्रकरणी पत्नीसह चार जणांवर मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार (Pune Crime) 4 डिसेंबर रोजी घडला आहे.

 

सौरभ झा (वय 31) असे आत्महत्या करणाऱ्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी सौरभची आई श्यामल किशोर झा (वय 59, रा. लोहगाव, पुणे) यांनी रविवारी (दि.11) मुंढवा पोलीस ठाण्यात (Mundhwa Police Station) फिर्य़ाद दिली आहे. पोलिसांनी सौरभ याची पत्नी, मेव्हणा, मेहुण्याची पत्नी आणि सासरे (सर्व रा. बिहार) यांच्याविरुद्ध आयपीसी 306, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी यांच्या मुलाला आरोपींनी पैशासाठी आणि बेंगलोर (Bangalore) येथे फ्लॅट घेण्यासाठी तगादा लावला होता.
तसेच आरोपींनी फिर्यादी यांच्या मुलाला शिवीगाळ करून हाताने मारहाण केली.
यामुळे त्याचे मानसिक संतुलन बिघडले होते. पत्नी आणि तिच्या कुटुंबाकडून होणाऱ्या त्रासाला वैतागून फिर्यादी
यांच्या मुलाने 4 डिसेंबर रोजी आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यू नोंद केली होती.
फिर्यादी यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Husband commits suicide out of frustration over wife and her family’s suffering; FIR against four including wife; Incidents in Mundhwa area

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Congress | सोनिया गांधी यांचा वाढदिवस वृद्धांसोबत केक कापून साजरा

PM Kisan | PM किसानच्या १३ व्या हप्त्यापूर्वी मोठी अपडेट, केंद्रीय कृषिमंत्र्यांनी दिली ‘ही’ माहिती

Ajit Pawar | शाई फेकली म्हणून खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा; राज्यपाल आणि भाजपच्या नेत्यांवर अद्याप गुन्हा का नाही? – अजित पवार