Advt.

Kranti Redkar | NCB च्या जळगाव, नांदेडमधील गांजा कारवाईनंतर क्रांती रेडकर यांचं ट्वीट; म्हणाल्या…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  Kranti Redkar | मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणानंतर राष्ट्रवादीचे नेते (NCP) आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी मुंबई एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर गंभीर आरोप केले. यानंतर राज्यात खळबळ उडाली. मात्र, मलिकांचे आरोपाचे सत्र सुरूच आहे. तर, समीर वानखेडे यांच्या पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर (Kranti Redkar) यांनी नांदेड आणि जळगावमध्ये एनसीबीने केलेल्या कारवाईवरून सूचक ट्वीट केलं.

 

आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथून जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथे मुंबई एनसीबीच्या (NCB) पथकाने 1500 किलो गांजा जप्त करत कारवाई केली.
तसेच, नांदेड जिल्ह्यात एनसीबीच्या पथकाने धडक कारवाई करत 1100 किलो गांजा जप्त केला.
यात एका ट्रकमधून गांजाची पोती जप्त करण्यात आलीय.
दोघा संशयित तस्करांना ताब्यात घेतलं आहे. या कारवाईबाबत माहिती समीर वानखेडे यांनीच दिली आहे.

 

या कारवाईनंतर समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर (Kranti Redkar) यांनी ट्वीटच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे.
‘ना रुकेंगे, ना थमेंगे…’ असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
वानखेडे यांच्यावर आरोप करणाऱ्या मलिक यांना व त्यांना पाठिंबा देणाऱ्यांना हा टोला असल्याची चर्चा आहे.

दरम्यान. आर्यन खान ड्रग्ज प्रकरण (Aryan Khan Drugs Case) हे खंडणीसाठी घडवून आणण्यात आलं होतं.
काही लोकांना अडकवण्यासाठी ठरवून क्रूझवर पार्टी ठेवण्यात आली होती.
यामागे वानखेडे हे होते, असा आरोप मलिक यांनी केला आहे.
या प्रकरणातील काही पंच पुढं आल्यानंतर पैशांची देवाणघेवाण झाल्याचंही समोर आलं होतं.
केवळ क्रूझ प्रकरणच नव्हे तर एनसीबीनं (NCB) अशा 26 प्रकरणांत बोगस कारवाया केल्याचाही नवाब मलिक यांचा आरोप आहे.

 

Web Title : Kranti Redkar | sameer wankhede’s wife and actress kranti redkar wankhede reaction after ncb seized ganja in jalgaon and nanded

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Rashmi Desai | शावर खाली अंघोळ करताना रश्मी देसाईचे फोटो व्हायरल, चाहते देखील फोटो पाहून झाले पागल

Rubina Dilaik | ‘बिग बाॅस 14’ विजेता रुबिनाचा पती अभिनव शुक्लाने शेअर केला ‘भन्नाट’ फोटो

Dr Amol Kolhe | ‘हॉस्पीटलमधील तुमच्या पेशंटसाठी म्हणाल का, याला भगव्याचच रक्त द्या’; अमोल कोल्हेंचा विक्रम गोखलेंवर निशाणा