Rubina Dilaik | ‘बिग बाॅस 14’ विजेता रुबिनाचा पती अभिनव शुक्लाने शेअर केला ‘भन्नाट’ फोटो
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Rubina Dilaik | ‘बिग बॉस 14’ (Bigg Boss 14) विजेता ठरलेली अभिनेत्री रुबिना दिलैक (Rubina Dilaik) तिच्या सोबत गोव्यामध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. बिग बॉस मध्ये रुबीना तिच्या पतीसोबत सहभागी झाली होती. तसेच बिग बॉसच्या घरापासूनच रुबीना आणि तिचा पती अभिनव शुक्ला (Abhinav Shukla) यांना लोकांनी भरभरून प्रेम देण्यास सुरुवात केली.
अभिनवने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून गोवा मधील काही फोटो शेअर केले आहेत. तर एका फोटोमध्ये रुबिना दिलैक (Rubina Dilaik) तिच्या पतीच्या मांडीवर बसलेली दिसत आहे. या फोटोमध्ये अभिनव शर्टलेस आहे तर रुबिनाने बिकनी परिधान केलेली आहे. चाहत्यांनी या फोटोवर भरभरून प्रेम दिलं असून अनेकांनी कमेंट्स केले आहेत.
काही दिवसांपूर्वीच रुबिना दिलैक आणि अभिनव शुक्ला दोघेही वेकेशन साठी मालदीवला (Maldives) गेले होते. त्यावेळी देखील रुबिनाने अतिशय बोल्ड अंदाजात बिकनी परिधान करून अनेक फोटो शेअर केले होते.
–
‘बिग बॉस 14’ विजेता ठरल्यानंतर रुबीनाने इंस्टाग्रामवर धुमाकूळ घातला आहे. नेहमी तिच्या सौंदर्यामुळे तिने अनेकांना आकर्षित केलं आहे.
अशातच बिग बॉस नंतर रुबिनाचा चाहते वर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
छोटी बहू (Choti Bahu), किन्नर (Kinnar) अशा अनेक मालिकांमधून रुबिनाने तिच्या अभिनयाची छाप उमटवली आहे.
बिग बॉसच्या घरात येण्याआधी रुबिना दिलैक आणि अभिनव शुक्ला दोघे एकमेकांपासून विभक्त (Divorce) होणार होते.
मात्र बिग बॉसच्या घरात या दोघांमधील प्रेम वाढल्याने दोघांनीही आपलं नातं न तोडण्याचा निर्णय घेतला.
तर यानंतर दोघांमधील प्रेम अधिक दृढ झाल्याचे देखील दिसून येत आहे.
Web Title :- Rubina Dilaik | abhinav shukla shared throwback maldives picture with rubina Dilaik
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update