Krishi UDAN scheme | खुशखबर! शेतकर्‍यांसाठी मोदी सरकारने सुरू केली नवीन सुविधा, उत्पन्न दुप्पट करण्यात होईल मदत

नवी दिल्ली : नागरी विमानन मंत्रालयाने (Ministry of Civil Aviation) बुधवारी कृषी उडान-2 योजना (Krishi UDAN scheme) सुरू केली. या अंतर्गत शेतकर्‍यांना कृषी उत्पादनांच्या वाहतुकीत मदतीसाठी पुर्वोत्तर, पर्वतीय आणि आदिवासी भागातील विमानतळांवर (Airport) कार्गोशी संबंधीत पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील.

केंद्राने (Modi Government) सप्टेंबर 2020 मध्ये कृषी उडान योजनेची (Krishi UDAN scheme) सुरूवात केली होती. या अंतर्गत जर शुल्क असलेल्या एकुण वजनात कृषी सामानाचा सहभाग 50 टक्केपेक्षा जास्त असेल, तर हवाई कार्गो संचालनासाठी निवडक भारतीय विमानतळांवर पार्किंग शुल्क आणि टर्मिनल नेव्हिगेशन लँडिंग शुल्क इत्यादीमध्ये सूट दिली जाते.

दिली जाईल ही सूट

केंद्राने आता कृषी उडान-2.0 च्या अंतर्गत कृषी सामानाचा भाग एकुण वजनात 50 टक्के कमी असेल
तरीसुद्धा निवडक विमानतळांवर विमानतळ शुल्कात पूर्ण सूट देण्याबाबत म्हटले आहे.
केंद्राने म्हटले की, या योजनेच्या (Krishi UDAN scheme) अंतर्गत विमानतळांवर टप्प्याटप्प्याने कार्गो टर्मिनल बनवले जातील.

उदाहरणार्थ 2021-22 मध्ये आगरतळा, श्रीनगर, डिब्रूगढ, दीमापुर, हुबळी, इम्फाळ, जोरहाट, लीलाबारी, लखनऊ,
सिलचर, तेजपुर, तिरुपती आणि तूतीकोरिनमध्ये विमानतळांवर कार्गो टर्मिनल स्थापन केले जातील.
तर 2022-23 मध्ये अहमदाबाद, भावनगर, झारसुगुडा, कोझीकोड, मैसूर, पुदुचेरी, राजकोट आणि विजयवाडामध्ये
विमानतळांवर कार्गो टर्मिनल स्थापन केले जातील.

शेतकर्‍यांना होईल मदत

याशिवाय कृषी उडान -2 च्या अंतर्गत (Krishi UDAN scheme) सरकार राज्यांना विमान इंधनावर विक्री कर कमी करून एक टक्का करण्यासाठी प्रोत्साहन देईल.
नागरी विमानन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी कृषी उडान 2.0 योजनेची सुरुवात करत म्हटले की,
याचा उद्देश एयरलाइनच्या लॉजिस्टिक मदतीने भारतीय कृषीच्या विशाल क्षमतेचा वापर करून शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करणे आणि त्यांना आत्मनिर्भर बनवण्याच्या लक्ष्याकडे घेऊन जायचे आहे.

हे देखील वाचा

Sameer Wankhede | समीर वानखेडेंच्या बहिणीची नवाब मलिकांविरोधात राष्ट्रीय महिला आयोगाकडे धाव; पोलीस ठाण्यातही दाखल केली तक्रार

Pune Crime | पुण्यातील ‘ससून’च्या तोतया डॉक्टरकडून 29 वर्षीय तरूणीवर बलात्कार; अश्लील फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Krishi UDAN scheme | modi government launches krishi udaan 2 0 scheme53 airports operated by aai covered check details

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update