Kriti Sanon | प्रभासबरोबर अफेअरच्या चर्चांवर क्रिती सेनॉनचा मोठा खुलासा; इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट शेअर करत सोडले मौन

पोलीसनामा ऑनलाइन टीम : Kriti Sanon | सध्या अभिनेत्री क्रिती सेनॉन ‘आदिपुरुष’ या चित्रपटांमुळे चर्चेत आहे. क्रितीने तिच्या हटके भूमिकेमुळे प्रेक्षकांची मने जिंकली आहेत, तर पहिल्यांदाच ती प्रभात सोबत आदिपुरुष चित्रपटात स्क्रीन शेअर करणार आहे. यामुळे केल्या काही दिवसांपासून क्रिती आणि प्रभासच्या अफेअरच्या जोरदार चर्चा सुरू होत्या. मात्र, आता क्रितीने या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. (Kriti Sanon)

 

नुकताच क्रिती सेनॉन आणि अभिनेता वरुण धवनची मुख्य भूमिका असलेला ‘भेडिया’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. अलीकडे चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हे दोघेही ‘झलक दिखला जा 10’ च्या फिनालेमध्ये आले होते. यावेळी झलक दिखला जाच्या सेटवर करण जोहरने वरुणला प्रश्न केला की, “क्रितीचे नाव यादीत का नाही?” यावर क्रिती म्हणते की, “मलाही हेच विचारायचं होतं”. त्यावर उत्तर देताना वरुण म्हणाला, “कारण क्रितीचे नाव कोणाच्या तरी हृदयात आहे एक व्यक्ती जी सध्या मुंबईत नाही आणि दीपिकाबरोबर शूटिंग करत आहे”. (Kriti Sanon)

यावेळी वरुणने प्रभासचे नाव न घेताच त्याचा उल्लेख केला आहे. कारण सध्या प्रभास दीपिकासह एका फिल्मच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. क्रितीने मात्र वरुण बोलल्यानंतर डोक्याला हात लावला आणि इतर कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. त्यामुळे प्रभास आणि क्रिती हे दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरू होत्या, तर क्रितीने instagram वर एक पोस्ट शेअर करत यावर मौन सोडले.

पोस्ट शेअर करत क्रिती म्हणाली, “हे प्रेम नाही किंवा प्रमोशनदेखील नाही.
आमचा ‘भेडिया’ म्हणजे वरुण धवन रिअ‍ॅलिटी शोमध्ये जरा जास्तच वाइल्ड झाला आणि लोकांनी त्याचा वेगळा अर्थ काढला.
त्यामुळे या अफवा पसरल्या. पण काही माध्यमांनी माझ्या लग्नाची तारीख जाहीर करण्याआधीच मी या अफवांना पूर्णविराम देते.
ही अफवा कशाचाही आधार नसलेली पूर्णतः बेसलेस आहे. त्यामुळे कृपया यावर विश्वास ठेवू नका”.
आदिपुरुष या चित्रपटात प्रभास क्रिती यांच्यासोबत सैफ अली खान आणि सनी सिंग यांच्यादेखील महत्त्वाच्या भूमिका आहेत,
तर या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले आहे. हा चित्रपट 16 जून 2023 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

 

Web Title :- Kriti Sanon | kriti sanon breaks silence on prabhas dating rumours says its neither pyaar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Vikram Gokhale | विक्रम गोखलेंच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित; ‘सूर लागू दे’ लवकरच थिएटरमध्ये धडकणार

Sanjay Raut | ‘उदयनराजेंचे अश्रू म्हणजे महाराष्ट्राचे अश्रू’

Nadav Lapid | ‘नदाव लॅपिड म्हणजे इस्रायलमधील जितेंद्र आव्हाड’ – अतुल भातखळकर