Kriti Sanon | अखेर क्रिती सेननने तिच्या आणि प्रभासच्या नात्यावर केले भाष्य; म्हणाली….

पोलीसनामा ऑनलाइन : बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सेनन (Kriti Sanon) तिच्या लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. क्रिती कार्तिक आर्यन सोबत शहजादामध्ये झळकली होती. सध्या शहजादा या चित्रपटामुळे तिची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. क्रिती गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या खाजगी आयुष्यामुळे देखील चर्चेत होती. अखेर क्रितीने (Kriti Sanon) तिचा आणि टॉलिवूड सुपरस्टार प्रभासचा साखरपुडा झाल्याच्या वृत्तावर मौन सोडले आहे.

क्रिती लवकरच अभिनेता प्रभास बरोबर ‘आदीपुरुष’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या प्रेक्षकांना तिच्या या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानच दोघांमधील जवळीक वाढल्याचे समोर येत होते. त्यातूनच दोघांनी गुपचूप मालदीव मध्ये साखरपुडा उरकल्याची माहिती समोर आली होती. अखेर अभिनेत्रीने या सर्व वृत्तांना पूर्णविराम देत आपले मत मांडले आहे. सध्या क्रितीने केलेले वक्तव्य सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

क्रिती सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. तरी ती कोणत्याच गोष्टीवर आपले मत स्पष्टपणे मांडत नाही.
मात्र जर अशा गोष्टींचा तिच्या कुटुंबांना त्रास झाला तर मात्र ती स्पष्टपणे आपले मत मांडत असते.
आता तिचा आणि प्रभासचा साखरपुडा झाल्याच्या बातम्या समोर येत असल्याने तिने यावर भाष्य करायचा विचार केला. यावेळी क्रितीने (Kriti Sanon) म्हटले की, “प्रेक्षक या गोष्टींना जास्त काळ लक्षात ठेवत नाहीत. अशा बातम्या नेहमीच चर्चेत असतात आणि कालांतराने ते लोक विसरूनही जातात. काही काळाने सर्व काही बंद होतं. यावरून तुमच्या लक्षात आलेच असेल की माझा आणि प्रभासचा साखरपुडा झाला नाही”. क्रितीने केलेल्या खुलासाने चाहते थोडेसे नाराज झाले असले तरी देखील चाहत्यांना अशी आशा आहे कि लवकरच हे दोघे विवाह बंधनात अडकतील.

Web Title :- Kriti Sanon | kriti sanon finally react on engagement with south superstar prabhas

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Masuta Marathi Movie | विविध सामाजिक गोष्टींवर भाष्य करणारा ‘मसुटा’ चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

Pune Crime News | फुरसुंगीत राडा ! गाड्यांवर, घरांवर दगडफेक करत तरुणाला बेदम मारहाण; 7 जणांवर FIR

Harmanpreet Broke Rohit Record | हरमनप्रीत कौरने मोडला रोहित शर्माचा ‘हा’ विक्रम; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय