Kunal Tilak | कुणाल टिळक यांना आंतरराष्ट्रीय संस्थेची शिष्यवृत्ती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Kunal Tilak | भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता व भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष कुणाल शैलेश टिळक ह्यांना प्रतिष्ठित कॉनरॅड आडेनोयर स्टीफ्टटंग (Konrad Adenauer Stiftung) शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली आहे. प्रतिष्ठित असलेल्या ह्या शिष्यवृत्तीत दक्षिण आशिया देशातल्या राजकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या तरुणांना आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अनुभव व मुत्सद्देगिरीचे प्रशिक्षण देण्यात येते. (Kunal Tilak)

कॉनरॅड आडेनोयर स्टीफ्टटंग हि जर्मनी मधील प्रतिथयश संस्था असून ह्या शिष्यवृत्ती मध्ये येत्या वर्षभरात ४ विविध देशांच्या राजकीय परिस्थिती व प्रचलित निवडणूक प्रक्रियेचे देखील अवलोकन व अभ्यास करण्याची संधी प्राप्त होणार आहे. देशातून केवळ ३ युवकांना हि शिष्यवृत्ती ह्या वर्षी मिळाली आहे. कुणाल टिळक हे ह्या वर्षी Youth 20 (Y20) मध्ये क्लायमेट चेंज ह्या विषयाचे प्रतिनिधित्व करत होते. ते भारताचे परराष्ट्रधोरण ह्या विषयावर विविध माध्यमातून लेखन करतात. ते महाराष्ट्र प्रशासकीय न्यायदंडाधिकरण येथे वकिली हि करतात. (Kunal Tilak)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NCP MP Supriya Sule | ३१ डिसेंबपर्यंत सुनावणी घेऊन आदेश द्या, सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया…”सत्यमेव जयते”

Maratha Reservation | होम ग्राऊंडवर नामुष्की! अजित पवारांच्या पोस्टरला फासले काळे