शाळकरी मुलीला पाहून पोलीस हवालदाराची अश्लील शेरेबाजी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनीला रस्त्यात अडवून तिचा विनयभंग केल्याची घटना सोमवारी (दि.४) सकाळी घडली होती. हा प्रकार मालाडमध्ये घडला. याप्रकरणी कुरार पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या एस. परब (वय-५०) या पोलीस हवालदाराला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. रक्षकच भकक्षक बनल्याची चर्चा सध्या मालाडमध्ये आहे.

पोलीस हवालदार परब हा मालाडच्या पश्चिम द्रुतगती मार्गावरील अदानी इलेक्ट्रिसिटी कार्यालयासमोर असणाऱ्या पोलिसांच्या पेट्रोलिंग व्हॅनवर कर्तव्यास होता. पीडित मुलगी ही कुरारमध्ये राहते. रोज शाळेतून येता-जाता परब हा पीडित मुलीला पाहून अश्लील शेरेबाजी करत होता. मात्र, मुलीने याकडे दुर्लक्ष केले.

सोमवारी ती शाळेत जात असताना परबने तिला पुन्हा बोलावले. पीडित मुलगी त्याच्याजवळ गेली असता त्याने तिला घट्ट मिठी मारली. या प्रकारामुळे पीडित मुलगी घाबरली. तीने आरडाओरड करत तीने तेथून पळ काढला आणि घरी जाऊन घडलेला प्रकार आपल्या पालकांना सांगितला. संतप्त पालकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पोलीस ठाण्यात फोन करुन तक्रार केली. पीडित मुलीचे पालक, शेजाऱ्यांनी पोलीस ठाण्यात गोंधळ घातला. कुरार पोलिसांनी परबवर पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करत त्याला अटक केल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

… और फिरसे कंगनाको गुस्सा आया आमिर, आलियावर भडकली कंगना