Kusha Kapila Divorce | सुप्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसर कुशा कपिला आहे कोट्यवधी रुपयांची मालकीण; लवकरच घेणार घटस्फोट

पोलीसनामा ऑनलाइन – Kusha Kapila Divorce | सोशल मीडियावर प्रेक्षकांना आपल्या व्हिडिओतून पोट धरु हसायला लावणारी प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसर कुशा कपिला (Social Media Influencer Kusha Kapila) ही लोकप्रिय व्यक्ती आहे. आपल्या व्हिडिओ, रिल्स आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल पोस्ट कऱणाऱ्या कुशाचे इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोवर्स आहेत. नुकतीचे तिने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चाहत्यांना धक्का देणारी बाब सांगितली आहे. ती पती झोरावर अहलूवालिया (Jhorawar Ahluwalia) याच्यापासून विभक्त होणार आहे. मोठा मेसेज टाईप करुन तिने पोस्ट करुन तिने घटस्फोटाची (Kusha Kapila Divorce) माहिती चाहत्यांना दिली आहे.

सोशल मीडिया इन्फ्लुएंसर कुशा कपिला हिचा चाहता वर्ग फार मोठा आहे. ती सोशल मीडिया इन्फ्लुएंसरमध्ये सर्वात जास्त मानधन घेणारी व्यक्ती आहे. फनी व्हिडिओ करणाऱ्या कुशा करोडो रुपयांच्या इस्टेटची मालकीण आहे. (Kusha Kapila Net Worth) दिल्लीमध्ये (Delhi) बालपण घालवलेल्या कुशाने आधी फॅशन रिपोर्टर म्हणून केली. काही काळ ती कंटेन्ट राय़टरचे काम करत होती. त्यानंतर तिने काही व्हिडिओ बनवल्या आणि ती लोकप्रिय झाली. कुशाचा बिल्ली मासी (BilliMassi) हा रोल अत्यंत गाजला. इंडिव्हिया (Idivia) सारख्या ब्रँडसाठी ती व्हिडिओ बनवत होती. त्यानंतर तिने हे काम सोडले आणि पूर्णपणे सोशल मीडियावर व्हिडिओ तयार करुन आपले स्थान निर्माण केले. तिचा सोशल मीडियावरील वावर वाढला. लोकप्रियता वाढली. तिच्या व्हिडिओला लाखो व्ह्युज मिळू लागले. डिजिटल वर्ल्डमध्ये कुशा कपिला हिने नाव कमावले. (Kusha Kapila Social Media)

आज कुशा खूप चांगली कमाई करत असून तिची लोकप्रियता सर्वत्र आहे. कुशाने ‘मसाबा मसाबा S2’ (‘Masaba Masaba S2’) मध्‍ये PR म्हणून काम केले. तसेच तिने स्‍वत:चा कॉमेडी शो देखील होस्ट केला आहे. कुशा कॉफ़ी विथ करण सीजन 7 (Koffee With Karan Season 7) च्‍या विशेष भागामध्‍येही दिसली आहे. याच बरोबर तिने ‘केस तो बनता है’ (Case To Banata Hai) आणि ‘एलओएल हंसे तो फंसे’ (LOL Hasse Toh Phasse) या हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. कुशाने नेटफ्लिक्सच्या (Netflix) ‘घोस्ट स्टोरीज (Ghost Stories) मध्ये कैमियो रोल साकारला आहे. एवढेच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील कांस्य या रेड कार्पेटवर (International Cannes Red Carpet) कुशाने 2023 मध्ये पदार्पण केले. तिच्या लुकवर चाहते भाळले होते. (Kusha Kapila On Cannes Red Carpet)

यशस्वी मॉडेल आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर कुशा कपिला मोठ्या शोमध्ये सहभागी होण्याचे चांगलेच पैसे घेते. तसेच तिचा युटुब चॅनेल असून त्यामधून ती लाखो रुपये कमावते. एका मीडिया रिपोर्ट्सनुसार, दक्षिण दिल्लीतील मावशी आणि मुलींची भूमिका साकारण्यासाठी प्रसिद्ध कुशा कपिलाची अंदाजे एकूण 20 कोटी रुपयांची संपत्ती आहे. (Kusha Kapila Property) कुशा ही सर्वाधिक मानधन घेणारी सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे. तिच्या घटस्फोटामुळे (Kusha Kapila Divorce) चाहत्यांना धक्का बसला.

Web Title : Kusha Kapila Divorce | social media influencer kusha kapila income source net worth know everything here

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा