Labour Ministry | कामगार मंत्रालयाने मजूरांच्या किमान वेतनात केली वाढ, 1 ऑक्टोबरपासून लागू होतील नवीन दर; जाणून घ्या कुणाला मिळणार लाभ

नवी दिल्ली : Labour Ministry | कामगार आणि रोजगार मंत्रालयाने (Ministry of Labor and Employment) केंद्रीय क्षेत्रातील 1.5 कोटी कामगारांसाठी परिवर्तनीय महागाई भत्त्याच्या दरात (rate of variable dearness allowance) सुधारणा केली आहे. महागाई भत्त्यातील वाढ 1 ऑक्टोबरपासून प्रभावी होईल, ज्यामुळे केंद्रीय क्षेत्रातील कर्मचारी आणि मजूरांच्या (Labour Ministry) किमान वेतनात वाढ होईल (Increase in the minimum wage of central sector employees and laborers).

मंत्रालयाने (Labour Ministry) एका वक्तव्यात म्हटले की, देश कोविड-19 महामारीला तोंड देत असताना केंद्रीय क्षेत्रातील विविध अनुसूचित रोजगारातील विविध श्रेणीतील मजूरांना एक मोठा दिलासा देत, कामगार आणि रोजगार मंत्रालयाने परिवर्तनीय महागाई भत्त्याचा (VDA) दर अधिसूचित आणि सुधारित केला आहे जो 1 ऑक्टोबर 2021 पासून प्रभावी होईल.

व्हीडीए औद्योगिक कामगारांसाठी सरासरी ग्राहक मूल्य निर्देशांक (CPI-IW) च्या आधारावर सुधारित केला जातो.
हा मूल्य निर्देशांक कामगार ब्यूरो (Office affiliated to the Ministry of Labor and Employment) द्वारे संकलित केला जातो.

केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव (Union Labor Minister Bhupendra Yadav) यांनी म्हटले की,
यामुळे देशभरात केंद्रीय क्षेत्रात विविध अनुसूचित रोजगारात असलेल्या जवळपास 1.5 कोटी मजुरांना लाभ मिळेल.
हे मजूर बांधकाम, रस्त्यांची देखरेख, रन-वे, भवन संचालन, स्वच्छता आणि सफाई, मालाची चढ-उतार इत्यादी (Labour Ministry) काम करत आहेत.

त्यांनी म्हटले की, हे सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास (Sabka Saath, Sabka Vikas, Sabka Vishwas, Sabka Prayas) या पंतप्रधानांच्या दृष्टीकोनाशी (Prime Minister Narendra Modi’s vision) अनुरूप आहे आणि ही वाढ एक ऑक्टोबर 2021 पासून प्रभावी होईल.

हे देखील वाचा

Puneeth Rajkumar passed away | साऊथचा सुपरस्टार पुनीत राजकुमार यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Chandrakant Patil | ‘राष्ट्रवादी बिनभरवशाची, काँग्रेसमध्ये दरोडेखोर नाहीत’

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Labour Ministry | labour ministry increased minimum wages for workers

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update