Black Fungus : कोरोनातून रिकव्हरीनंतर सुद्धा होऊ शकतो ब्लॅक फंगसचा धोका, ‘या’ लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोना व्हायरसची महामारी सुरू असतानाच आता फंगसची (Black Fungus ) प्रकरणे वाढू लागली आहेत. अनेक लोकांना कोविडमधून रिकव्हर झाल्यानंतर सुद्धा फंगल इन्फेक्शन होत आहे. अशावेळी रूग्णांना पुन्हा हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट व्हावे लागत आहे. यामुळे कोविड-19 मधून बरे होणार्‍या रूग्णांनी आपल्या शरीरात दिसणार्‍या काही लक्षणांबाबत खुप सावधगिरी बाळगली पाहिजे. ही लक्षणे ब्लॅक फंगसची असू शकतात.

1 डोकेदुखी –
कोविडमधून रिकव्हरीनंतर जर सतत डोकेदुखी किंवा एखाद्या ठिकाणी दबाव जाणवत असेल तर, हे ब्लॅक फंगसचे लक्षण असू शकते. हे फंगस नाकातून मेंदूपर्यंत पोहचू शकते.

2 चेहर्‍यावर एका बाजूला सूज –
चेहर्‍यावर एका बाजूला सूज, वेदना आणि खालच्या बाजूला जडपणा जाणवू शकतो. त्वचा लाल होऊ शकते.

3 त्वचेचा रंग बदलणे –
ब्लॅक फंगसच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये अनेक लोकांच्या नाकाजवळ काळी पापडी बनत आहे, अनेक लोकांच्या चेहर्‍याचा रंग खराब होत आहे. डोळे जड होत आहेत.

4 नाक ब्लॉक होणे –
फंगस शरीरात नाकद्वारे शिरतो. यामुळे नाक बंद होणे, श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. काही प्रकरणात लंग्जवर सुद्धा अटॅक करतो.

5 दात कमजोर होणे –
दात सैल होणे, जबड्याच्या समस्या होऊ शकतात. या प्रकरणात ऑपरेशनची गरज भासते.तोंडाची स्वच्छता ठेवा. कोरोनातून बरे झालेल्या रूग्णांनी आपला ब्रश वेगळ्या ठिकाणी ठेवावा. ब्रश आणि टंग क्लीनर नियमित अँटीसेप्टिक माऊथवॉशने स्वच्छ करा.

READ ALSO THIS :

Coronavirus Vaccination : कोविड-19 व्हॅक्सीनच्या साईड-इफेक्ट्सपासून आराम देऊ शकते का नारळपाणी?, जाणून घ्या

मुंबईतील दुकाने सम-विषम फार्म्युल्याने दुपारी 2 पर्यंत सुरु राहणार, महापालिकेकडून वेळापत्रक जारी

1 जून राशीफळ : ‘या’ 5 राशींसाठी जूनचा पहिला दिवस जबरदस्त, धनलाभाचे प्रबळ संकेत