Lady Police | लग्‍नाच्या आमिषाने महिला पोलिसला अनेक लॉजवर फिरवलं, बलात्कार प्रकरणी सोलापूरमध्ये तिघांवर FIR दाखल

सोलापूर न्यूज (Solapur News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – लग्‍नाचे आमिषाने राज्य सुरक्षा दलातील एका गार्डने महिला पोलिसावर (Lady police) विविध ठिकाणी लॉजवर नेऊन वांरवार बलात्कार (Rape) केला. त्यातून गर्भवती झाल्यानंतर लग्‍नाआधी मूल नको म्हणून गर्भपात (Abortion) केला. त्यानंतर लग्न करण्यास नकार दिल्याची घटना सोलापूरात (Solapur) उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडित महिला पोलिसाच्या (Lady police) फिर्यादीवरून आरोपीसह त्याची बहीण आणि भाऊजीवर गुन्हा (FIR) दाखल झाला आहे. Lady police | rape of a ledy police officer in the lure of marriage, fir on three in solapur

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

गणेश अर्जुन पाखरे (रा. पेनूर, ता. मोहोळ) असे गुन्हा दाखल झालेल्या महाराष्ट्र सुरक्षा बलातील गार्डचे नाव आहे. तसेच गणेशची बहीण प्रियंका आणि भाऊजी उमेश राजगुरू यांच्यावरदेखील गुन्हा दाखल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला पोलिस नाईक या सोलापूर ग्रामीण पोलीस दलात कार्यरत आहेत.
2018 मध्ये त्या गणपती विसर्जनाच्या ड्युटीवर असताना त्यांची ओळख कामती पोलिस ठाण्यातील होमगार्ड चंद्रकांत शेंबडे यांच्याशी झाली.
एप्रिल 2019 मध्ये चंद्रकांतने त्याचा मित्र गणेश पाखरे याची ओळख करून दिली.
ओळखीनंतर गणेश आणि पीडित महिला एकमेकांचे मोबाईक क्रमांक घेतले.
सुरूवातीच्या काळात मोबाईलवर बोलण्यातून दोघात मैत्री झाली.
त्यानंतर मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले.

त्यानंतर गणेशने पिडितेला लग्‍नाचे आमिष दाखवून 1 जुलै 2020 ते 1 ऑक्टोबर 2020 या काळात शहरातील खतीबनगर, अक्कलकोट रोड, त्यानंतर तुळजापूर तालुक्यातील शिवनेरी लॉज, बार्शी रोडवरील दर्शन लॉज आणि सुप्रजा लॉज येथे नेऊन वेळोवेळी बलात्कार केला.
त्यातून गर्भवती झाल्यानंतर लग्‍ना अगोदर मुल नको म्हणून आरोपी गणेश याची बहीण प्रियंका राजगुरू व तिचा पती उमेश राजगुरू यांनी जबरदस्तीने गर्भपात केला.
पण त्यानंतर लग्‍नास नकार दिला.
यामुळे पीडित महिलेने एमआयडीसी पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दिली.
याप्रकरणी तिघांवर गुन्हा (FIR) दाखल झाला आहे.
सहाय्यक पोलिस निरीक्षक धनंजय मोरे (Assistant Police Inspector Dhananjay More) तपास करत आहेत.

Web Title :-  Lady police | rape of a ledy police officer in the lure of marriage, fir on three in solapur

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पुण्यातील खळबळजनक घटना ! तपासासाठी गेलेल्या गुन्हे शाखेच्या पोलिसांवर जमावाचा प्राणघातक हल्ला; पुण्यात दीडशे जणांवर FIR दाखल

Pune Crime News | शेअर बाजारात गुंतवणुकीचे अमिष दाखवून अनेकांना गंडा घालणाऱ्यास पुण्यात अटक

राज्यात डेल्टा प्लस विषाणूचे संकट; 21 रुग्ण आढळले; मुंबईकरांना मात्र दिलासा !

रिलायन्स समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी आज काय करणार ‘नवीन घोषणा’ ! आजच्या AGM मध्ये 5जी ची घोषणेचा कयास