लेडी सिंघम ! मेहुल चोक्सीला भारतात परत आणण्यासाठी शारदा राऊत डॉमिनिकात दाखल

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – पीएनबी घोटाळ्यात (pnb bank fraud) सुमारे 14 हजार कोटींचा चुना लावून फरार झालेला आरोपी मेहुल चोक्सीला डॉमिनिका येथे पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान त्याला परत भारतात आणण्यासाठी 8 अधिका-यांची टीक डॉमिनिकामध्ये दाखल झाले आहे. सीबीआयच्या प्रमुख शारदा राऊत या टीमचे नेतृत्व करत आहेत. त्यांनीच पीएनबी घोटाळ्याच्या (pnb bank fraud) तपासाचे नेतृत्व केले होते. त्या 2005 बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. त्यांची काम करण्याची एक वेगळीच स्टाईल आहे. चोक्सी 2018 पासून अँटिगामध्ये राहत आहे.

डॉमिनिकामध्ये पोहोचलेल्या 8 सदस्यांच्या या टीममध्ये सीबीआय, ईडी आणि सीआरपीएफचे दोन दोन अधिकारी आहेत. बँकिंग अफरातफर प्रकरणांच्या सीबीआय प्रमुख शारदा राउत या टीमच्या नेतृत्व करणार आहेत. त्यांनीच पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणाच्या तपासाचे नेतृत्व केले होते. शारदा राऊत यांचा जन्म महाराष्ट्रातील नाशिकमध्ये झाला आहे. पालघरमध्ये एसपी असताना त्यांनी गुन्हेगारीवर जबरदस्त नियंत्रण मिळविले होते.

नागपूर, मीरा रोड, नंदुरबार, कोल्हापूर, मुंबई आदी शहरांमध्ये त्यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यात मोठे योगदान दिले होते. एका वृत्तानुसार ही टीम 28 मे रोजी डॉमिनिकामध्ये दाखल झाली आहे. उद्या मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणासंबंधीच्या सुनावणीमध्ये ही टीम वकिलांना मदत करणार आहे. ईडीची टीम उद्या तेथील न्यायालयात अ‍ॅफिडेव्हीट दाखल करणार आहे. यात चोक्सी हा भारतीय नागरिक असल्याचे सांगितले जाईल. याचा अहवाल तयार असून केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर तो उद्या न्यायालयात सादर केला जाणार आहे.

 

Also Read This : 

 

डोळ्याजवळील सुरकत्या दूर करण्यासाठी ‘हे’ फूड्स रामबाण उपाय, 7 दिवसांमध्ये दूर होईल समस्या

 

चंद्रकांत पाटलांआधीच सांगोल्याच्या ‘या’ प्राध्यापकानं केली शरद पवारांवर PhD, पण…

 

सतत गोड खाण्याची इच्छा शांत करण्यासाठी ‘या’ 4 ‘टिप्स’ अँड ‘ट्रिक्स’ची घ्या मदत, जाणून घ्या

 

चंद्रकांत पाटलांचा सवाल, म्हणाले – ‘संभाजीराजेंनी राजीनामा देऊन काय होणार? हे सरकार कोडगं’

 

6 तासांपेक्षा कमी झोपणार्‍यांना होऊ शकतो मानसिक आजार, 35 वर्षांच्या रिसर्चनंतर शास्त्रज्ञांनी केला खुलासा