‘लग्न मुबारक’ चित्रपटाचे शो पोलिसांनी केले बंद

ADV

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन

लग्न -मुबारक हा चित्रपट आज दिनांक ११ मे रोजी महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. मात्र आता या चित्रपटाला प्रदर्शनापूर्वीच फुल स्टॉप मिळत आहे. माहाराष्ट्रातील इतर ठिकाणांप्रमाणे अहमदनगर येथे देखील हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे . मात्र कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांनी फोउजदारी दंड संहिता कलम १४९ द्वारे तेथील थिएटर मालक तेजस करंदीकर यांना नोटीसीद्वारे ‘लग्न -मुबारक’ चित्रपट प्रदर्शित करू नये असे सांगितले.

ADV

या नोटीसीद्वारे पोलिसांकडून कळविण्यात आले आहे की , लग्न-मुबारक या चित्रपटाला हिंदू -मुसलीम संघटनेचा आक्षेप आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यास ठिकठिकाणी निदर्शने करण्यात येतील असे पोलीस स्टेशन ला गोपनीय रित्या समजले आहे. मागील काही काळात या पोलीस स्टेशन हद्दीत दोन समाजात तेढ निर्माण न होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. तरी हा चित्रपट प्रदर्शित करू नये असे कळविण्यात आले आहे. जर हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि कायदा आणि सुव्यवसंस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर कायदेशीर कारवाई होईल असे सांगितले आहे.