लग्नानंतर बदलली इलियाना डिक्रूजची ‘फिगर’, फोटो होतायेत व्हायरल ! पहा कशी होती अन् कशी झाली

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  बॉलिवू़ड अ‍ॅक्ट्रेस इलियाना डिक्रूज गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या बोल्ड फोटो आणि हॉट अवतारामुळं चर्चेत येत आहे. तिनं नुकताच एक नवीन फोटो चाहत्यांसोबत शेअर केला होता. इलियाना यात व्हाईट बिकीनीत दिसत होती. पुन्हा एकदा इलियाना आपल्या फिगर आणि लुकमुळं इलियाना चर्चेत आली आहे. परंतु यावेळी कारण मात्र काही औरच आहे. नुकतीच इलियाना एका ठिकाणी स्पॉट झाली. लग्नांनतर ती जाड झाली आहे असं चाहत्यांचं म्हणणं आहे.

अलीकडेच इलियानाचे काही फोटो सोशलवर व्हायरल होत आहे. यात इलियाना ओळखूच येत नाही. कारण यात तिची फिगर काहीशी वाढलेली दिसत आहे. खास करून तिच्या शरीराचा खालचा भाग. अशी माहिती आहे की, इलियाना एका गंभीर आजारानं ग्रस्त आहे. यात शरीराचा खालचा भाग जास्त वाढतो. खुद्द इलियानानंही याबाबत एका मुलाखतीत खुलासा केला होता. पागलपंती सिनेमातही याचा अंदाज येतो आहे. यात शेवटची दिसली होती. लहानपणापासूनच तिला ही समस्या असल्याचं तिनं सांगितलं आहे. ती खूप दिवस यामुळं नैराश्येत होती. परंतु नंतर तिनं स्वत:ला आहे तसं स्विकार केलं.

इलियानानं तिच्या परदेशी बॉयफ्रेंडसोबत लग्न केलं. लग्नानंतरच तिचं वजन जास्त वाढलं आहे आणि म्हणूनच ती सिनेमांपासून दूर आहे असंही अनेकांनी म्हटलं आहे.

इलियानाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर लवकरच आता ती अजय देवगण निर्मित द बिग बुल या सिनेमात अभिषेक बच्चनसोबत काम करताना दिसणार आहे. हा सिनेमा 23 ऑक्टोबर 2020 रोजी रिलीज होणार आहे. काही दिवसांपूर्वीच ती पागलपंती या सिनेमात दिसली होती. या सिनेमात इलियाना, जॉन अब्राहम, अनिल कपूर, सौरभ शुक्ला, कृति खरबंदा अरशद वारसी, उर्वशी रौतेला, पुलकित सम्राट प्रमुख भूमिकेत होते. हा सिनेमा 22 नोव्हेंबर रोजी रिलीज झाला होता.

https://www.instagram.com/p/B_e4fXDJx5q/

https://www.instagram.com/p/B_cdi2EpFMw/

https://www.instagram.com/p/B-K1Slvhb6Y/

https://www.instagram.com/p/B8wa7ZVh5Yn/

https://www.instagram.com/p/B-oVuc9hsjE/

https://www.instagram.com/p/B-ZvpgoBpk-/

https://www.instagram.com/p/B-XCL4NhLxb/

https://www.instagram.com/p/CBBiAEUBXaE/