लासलगाव : बाजार समितीत टोकन घेण्यासाठी तोबा गर्दी

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे नाशिक जिल्ह्यात अंशतः लॉकडाऊन शिथिल केल्याने बंद असलेल्या लासलगावसह जिल्ह्यातील कांद्याच्या बाजार समित्या सुरू झाल्या आहे पण नोंदणीकृत 500 वाहनातील कांद्याचे दररोज लिलाव केले जाणार असल्याने आपल्या वाहनाची नोंद करण्यासाठी शेतकऱ्यांनी बाजार समिती आवाराच्या प्रवेशद्वारावर मोठी गर्दी केली होती मात्र मोबाईल वरून बाजार समितीने दिलेल्या क्रमांकावर फोन करत ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करण्याची सुविधा असतानाही बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर शेतकर्यांनी मोठी गर्दी केल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे पाहायला मिळाले यावेळी बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे आणि पोलिसांनी कोरोनाचा आपल्याला विसर पडला आहे का असे विचारत शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र शेतकरी ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसल्याचे दिसून आले.

लासलगाव बाजार समिती 620 वाहनातून आलेल्या 12 हजार 847 क्विंटल कांद्याला कमाल 1753 रुपये, किमान 700 रुपये तर सर्वसाधारण 1420 रुपये इतका बाजार मिळाला

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नियम आणि अटी घातल्याने पाचशे वाहनाची नोंदणी होत असल्यामुळे पावसाळ्याच्या तोंडावर शेता पडून असलेला कांदा विक्री न झाल्यास मोठे नुकसान होईल यासाठी वाहनांची मर्यादा एक हजार करावी अशी मागणी यावेळी चांदवड तालुक्यातील वाकी खु येथील कांदा उत्पादक शेतकरी समीर देवडे यांनी केली