अमेरिकेच्या रिपोर्टमध्ये ‘खुलासा’, ‘लष्कर’ आणि ‘जैशे’ भारतामध्ये हल्ला घडविण्याच्या तयारीत

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – पाकिस्तानी दहशतवादी संघटना लष्कर ए तैयबा आणि जैश ए मोहम्मद भारत आणि अफगाणिस्तानामध्ये हल्ला करण्याच्या तयारीत आहेत. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या एका अहवालात हा खुलासा करण्यात आला आहे. पाकिस्तान सरकारने या दोन्ही संघटनांवर योग्य ती कारवाई केली नाही. उलट सरकारने या दहशतवाद्यांना प्रशिक्षण आणि निधी देऊन त्यांना हल्ल्यासाठी प्रोत्साहन दिले आहे.

या दोन संघटनांनी भारतामध्ये नेहमीच हल्ले केले आहेत. जम्मू काश्मीरमध्ये होणाऱ्या अतिरेकी कारवायांवर भारताने पाकिस्तानला जबाबदार ठरवले आहे. दहशतवादी संघटनांचा शोध घेण्यात, त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी भारताने पाकिस्तानवर दबाव टाकला आहे. पाकिस्तानने अफगाणिस्तानमधील तालिबान आणि हक्कानी सारख्या संघटनांना आपल्या देशात कारवाई न केल्याचा आरोप अमेरिकेच्या अहवालात म्हटले आहे.

दहशतवाद्यांकडून व्हॉट्सअ‍ॅपचा वापर
व्हॉट्सअ‍ॅपचा वापर दहशतवाद्यांच्या भरतीसाठी केला जात आहे, त्याबद्दल भारताकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. गृह मंत्रालय आणि सुरक्षा यंत्रणांनी 5 ऑगस्टपासून जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात सुरक्षा वाढविली आहे. भारतीय सरकारी अधिकाऱ्यांना इंटरनेटच्या वापराविषयीची चिंता सतावत असल्याचे अमेरिकेच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Visit : Policenama.com 

शिंक कधीच दाबून ठेऊ नका, शरीरावर होऊ शकतात ‘हे’ गंभीर परिणाम
अभिनेत्री मलाइका अरोडा म्हणते, ‘खास डाएटपेक्षा नेहमी पौष्टिक आहार घ्यावा’
प्रेशर कुकर वापरताना ‘हे’ १० नियम आवश्य पाळा…आणि सुरक्षित रहा
मानसिक, शारिरीक आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर ‘हे’ जरूर वाचा
उर्जा आणि उत्साह दिवसभर टिकवण्यासाठी ‘हे’ आवश्य करा, जाणून घ्या
संक्रमणापासून बचावासाठी करा; या विटॅमिनचा वापर, जाणून घ्या –
चांगल्या आरोग्यासाठी शरीराला दररोज किती कॅलरीजची असते आवश्यकता –
वजन कमी करण्याचा ‘हा’ आहे खास ‘जपानी फार्मुला’! जाणून घ्या