फायद्याची गोष्ट ! Hero Electric खरेदीदारांना मिळतेय Optima इलेक्ट्रिक स्कूटर जिंकण्याची ‘सुवर्ण’संधी

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : जगभरात कोरोना व्हायरसने उच्छाद मांडला आहे. यामुळे अर्थव्यवथाबरोबर आणि आपली जीवनशैलीदेखील विस्कळीत होत आहेत. अशा परिस्थितीत, आता लोक सार्वजनिक वाहुतुकीवरून व खाजगी वाहतुकीकडे जात आहेत, यात सर्वोत्तम उपाय म्हणजे इलेक्ट्रिक स्कूटर. ही केवळ पर्यावरणासाठी चांगली नाही तर ते पेट्रोल इंजिन स्कूटरपेक्षा अधिक फायदेशीर आहे आणि कमी मेंटेंनन्ससोबत येते. अशा परिस्थितीत हीरो इलेक्ट्रिक आपल्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या विक्रीसाठी ग्राहकांना नवीन ऑफर देत आहे. सध्या अस्तित्त्वात असलेल्या आणि नवीन ग्राहकांसाठी ही कंपनी ‘ Be a Bike Buddy ‘ योजना घेऊन आली आहे.

जे ग्राहक हीरो इलेक्ट्रिक उत्पादन खरेदी करू इच्छित आहेत, त्यांना दोन हजार रुपयांची फ्लॅट सूट देण्यात येत आहे. याशिवाय असे ग्राहक जे विद्यमान हिरो ई-बाईकच्या मालकाकडून रेफर केले जातात, त्यांना देखील दोन हजार रुपयांच्या अतिरिक्त सूटचा लाभ देण्यात येत आहे. हिरो ई-बाईक खरेदीवर जास्तीत जास्त 4,000 रुपयांची सूट देण्यात येत आहे. याद्वारे हीरो इलेक्ट्रिक स्कूटर बुक करणाऱ्या प्रत्येक 50 व्या ग्राहकांना ” Glyde e-scoot ” विनामूल्य दिले जात आहे.
हीरो इलेक्ट्रिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी सोहिंदर गिल म्हणाले, “आमच्याकडे 3 लाखाहून अधिक ई-बाईक मालक आहेत, जे आमचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आहेत आणि त्यांच्या मित्रांना हिरो ई बाइक्स खरेदी करण्यासाठी रेफर करत आहेत.” Be a Bike Buddy ” योजना आता त्यांना परवडणारी, सोयीस्कर आणि शून्य प्रदूषण असणारी हीरो ई बाईकचा लाभ घेण्यासाठी संभाव्य ग्राहकांना 2000 रुपयांची सवलत देण्यास परवानगी देते. कंपनी बदल्यात विद्यमान हिरो ई-बाईक मालकांना 1000 रुपयांची सूट कूपन आणि विनामूल्य हिरो ऑप्टिमा जिंकण्याची संधी देते.

ते पुढे म्हणाले, “आमच्या पूर्वीच्या योजना यशस्वी झाल्या आहेत आणि मला विश्वास आहे की, ही कल्पना समविचारी नागरिकांचा समुदाय तयार करण्यास मदत करेल, जे एका स्वच्छ वातावरणाची देखरेख करतात आणि परवडणारी, सोयीची आणि आरामदायी हिरो ई – बाईक स्विच करत पर्यावरणाला हरित बनविण्यात हातभार लावतात. “