“लेथ जोशी” तैवान आणि रशिया महोत्सवात

मुंबई :  पोलीसनामा आॅनलाईन

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर २० हून अधिक पुरस्कार पटकावलेला “लेथ जोशी” या चित्रपटानं रशिया आणि तैवानमध्ये धडक मारली आहे. या चित्रपटाची तैवानमधील ५८व्या आशिया पॅसिफिक चित्रपट महोत्सवासाठी आणि रशियातील साखलीन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवड झाली आहे. अमोल कागणे स्टुडिओजच्या अमोल कागणे आणि लक्ष्मण कागणे यांनी प्रस्तुत केला आहे. प्रवाह निर्मिती, डॉन स्टुडिओज निर्मित हा चित्रपट मंगेश जोशी यांनी दिग्दर्शित केला आहे. लेथ यंत्राशी भावनात्मकरित्या जोडलेल्या एका कामगाराची भावस्पर्शी कथा “लेथ जोशी” या चित्रपटातून मांडण्यात आली आहे. काळाच्या ओघात कौशल्याची साधनं आणि त्याच्याशी जोडलेल्या भावनाही लोप पावतात. ही निरंतन प्रक्रिया आहे. ‘हलाल’ नंतर “लेथ जोशी” हा आशयसंपन्न चित्रपट आम्ही प्रस्तुत केला. सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचं भाष्य हा चित्रपट करतो. आम्ही असेच आशयसंपन्न चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहोत,’ असं अमोल कागणे यांनी सांगितलं.

लेथ जोशी ‘च्या अभिनयासाठी चित्तरंजन गिरी यांना नामांकन

जगभरातील विविध चित्रपट महोत्सवात मराठी चित्रपटाचा सातत्याने प्रभाव पडत आहे आणि आता ‘लेथ जोशी ‘ या आशयपूर्ण चित्रपटातील अभिनयासाठी चित्तरंजन गिरी यांना सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी नामांकन प्राप्त झाले आहे. ‘लेथ जोशी ‘ या चित्रपटाला समिक्षकांची उत्तम दाद मिळाली आहे.