Latur Crime News । चालकाची दगडानं ठेचून केली हत्या

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन – Latur Crime News । एका अज्ञात व्यक्तीची 16 जून रोजी दगडानं ठेचून हत्या (Murder) करण्यात आली होती. तर मृताची ओळख पटू नये म्हणून आरोपींची सगळे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. बालाजी बनसोडे (वय, 35 जि. नांदेड रा. बिहारीपूर) असं हत्या झालेल्या व्यक्तीच नाव आहे. ही घटना लातूर (Latur) जिल्ह्यातील देवणी (Devani) तालुक्यातील वलांडी गावच्या शिवारात घडली आहे. मात्र, 21 दिवसाच्या पोलिसांच्या तपासनंतर या घटनेचा उलगडा झाला आहे. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. मुख्यतः म्हणजे या हत्येचं कारण एकूण पोलीस (Police) देखील चकित झाले आहेत.

Mumbai Crime News । दुबईवरुन परतलेल्या युवतीची हॉटेलमध्येच गळफास घेऊन आत्महत्या, प्रियकर आणि त्याच्या पत्नी विरोधात तक्रार

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, 16 जूनच्या रात्री देवणी तालुक्यातील वलांडी याठिकाणी बालाजी बनसोडे (Balaji Bansode) यांची दोघांनी दगडानं ठेचून हत्या (Murder) केली आहे. यानंतर आरोपींनी पुरावा नष्ट करण्यासाठी बनसोडे यांच्याजवळील सर्व कागदपत्रे, ओळखपत्र, मोबाईल फोन घेऊन पसार झाले आहेत. आरोपींनी मृत बालाजी बनसोडे चालवत असलेलं पिकअप घेऊन घटनास्थळावरून पलायन झाले. यानंतर, घटनेच्या 5 दिवसांनी बालाजी बनसोडे यांचा मृतदेह देवणी तालुक्यातील वलांडी शिवारात स्थानिक लोकांना आढळून आला. तसेच हत्येचं (Murder) प्रकरण उघडकीस आलं. पण मयत व्यक्तीची ओळख पटेल असा कुठलाही पुरावा नव्हता. यानंतर पोलिसांनी तपास करत दोन आरोपींना ताब्यात घेतलं. यांनतर त्या दोघांनी हत्येची कबुली दिली आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहेत.

दिलीप कुमार- सायरा बानो यांना कायम सतावत राहिली एक खंत; जाणून घ्या

Latur Crime News | dispute over stopping vehicle driver crashed with stone to death murder mystery raveled after 3 weeks

नेमकं काय आहे प्रकरण?
16 जून रोजी आरोपी विकास रघुनाथ सूर्यवंशी (Vikas Raghunath Suryavanshi) (रा.
हेळंब ) आणि ज्ञानेश्वर भारत बोरसुळे (Dnyaneshwar Bharat Borsule) (रा. हेळंब ) यांना
उदगीरला जायचं होतं. त्यांनी अनेक वाहनांना हात करून थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र वाहनं
थांबली नाही. त्यावेळी मृत बालाजी बनसोडे हे महिंद्रा पिकअप घेऊन त्याच रस्त्याने जात होते.
त्यावेळी आरोपी विकास सूर्यवंशी आणि ज्ञानेश्वर बोरसुळे यांनी मृत बालाजी बनसोडे यांच्या
वाहनाच्या आडवं येऊन वाहन थांबवलं. या कारणामुळे चालक बालाजी बनसोडे आणि त्या दोन आरोपींमध्ये वाद झाला. यातूनच आरोपींनी बालाजी बनसोडे यांची दगडानं ठेचून हत्या केली आणि त्याची गाडी घेऊनही पसार झाले.

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Latur Crime News | dispute over stopping vehicle driver crashed with stone to death murder mystery raveled after 3 weeks

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update