Latur News | ….अन् ग्रामपंचायतीसमोर चिता रचून केले अंत्यसंस्कार

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन – Latur News | हणमंतवाडी अं. बु. (ता. निलंगा) येथील स्मशानभूमीच्या जागेचा प्रश्न तब्बल २० वर्षांपासून शासनाच्या लाल फितीत अडकला आहे. जागा मिळत नसल्याने स्मशानभूमी नाही त्यामुळे मृत लोकांवर अंत्यसंस्कार करण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच गुरुवारी ७० वर्षीय सोजरबाई रामचंद्र निकम यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.पण अंत्यसंस्काराचा प्रश्न निर्माण झाल्याने ग्रामस्थ संतप्त झाले. त्यांनी थेट ग्रामपंचायतीसमोर चिता रचून अंत्यसंस्कार केले. या घटनेमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. (Latur News)

गेल्या २० वर्षांपासून स्मशानभूमी साठी जागेची मागणी होत आहे पण जागा हा प्रश्न निकाली निघाला नाही. वारंवार प्रशासनाकडे मागणी करण्यात आली होती. येथील जागेचा वाद न्यायप्रविष्ट असल्याने गावातील मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करायचे कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. (Latur News)

अंबुलगा तलावानजीक जागा उपलब्ध…

तहसीलदार गणेश जाधव म्हणाले की, १९८५ मध्ये सार्वजनिक स्मशानभूमीसाठी २० गुंठे जागा अधिग्रहित करण्यात आली होती. परंतु, त्या जागेची विक्री करण्यात आली आहे. दरम्यान, खरेदीदाराने न्यायालयातून मनाई हुकूम आणला आहे. परंतु, अंबुलगा तलावाजवळ असणारी जागा अंत्यविधीसाठी ग्रामसेवक तलाठ्यांनी उपलब्ध करून दिली आहे पण तरीही काही नागरिकांनी ग्रामपंचायतीसमोर अंत्यविधी करून अतिरेक केला आहे.

स्मशानभूमीच्या जागेचा वाद न्यायालयात…

सरपंच प्रभाकर मलिले म्हणाले, ग्रामपंचायतीने सार्वजनिक स्मशानभूमीसाठी जी चार गुंठे जागा खरेदी केली होती. ती जागा संबंधित शेतमालकाने एकाला विकली. त्या दोघांकडूनही जागा मिळत नसल्याने ग्रामपंचायतीने न्यायालयात धाव घेतली आहे. स्मशानभूमी तयार करण्यासाठी ग्रामपंचायतीने वारंवार पाठपुरावा केला पण शासन जागा देत नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः यामध्ये लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी मलिले यांनी केली आहे.

Web Title : Latur News | funeral in front of gram panchayat as there is no cemetery hanumantwadi nilanga

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Blood Sugar Range | मुले, प्रौढ आणि ज्येष्ठांची किती असावी ब्लड शुगर, पहा संपूर्ण चार्ट

 

Pune Police | पुणे पोलीस शहर दलातील 4 ‘अति’ वरिष्ठ अधिकाऱ्यांना ‘कोरोना’ची लक्षणे,
पदभार इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे

 

Omicron | ओमिक्रॉनच्या ‘या’ 4 लक्षणांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष, होऊ शकते मोठी समस्या