‘आसरा’ अ‍ॅपचा शुभारंभ

मुंबई :पोलीसनामा ऑनलाइन 

झोपडपट्टी पुनर्वसन  प्राधिकरणाने तयार केलेल्या ‘आसरा’ मोबाईल अ‍ॅपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी अ‍ॅपचे सादरीकरण करुन माहिती दिली.  यावेळी गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता, गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर, गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार तसेच झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

[amazon_link asins=’B00B4BBF94,B00JGQ3KVK’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f1c70f1c-b67a-11e8-8a44-8325f6b31aae’]
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने डिजिटलायझेशनची चांगली सुरूवात केली आहे. झोपडपट्टीवासियांना विविध सोयीसुविधा, योजना यांची माहिती होण्याच्या दृष्टीने ‘आसरा’ अ‍ॅपचा उपयोग नक्कीच होईल. या विभागाने त्यांच्या संपूर्ण कामकाज आणि व्यवहाराचे डिजिटलायझेशन करावे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
[amazon_link asins=’B077R4X6TJ,B07D9TSC5N’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0b42583f-b67b-11e8-892e-417ce4cc075a’]

 आसरा’ हे ॲप इंग्रजी व मराठी भाषेत उपलब्ध असून महापालिका हद्दीतील झोपडपट्टी पुनर्वसन योजनांची सविस्तर माहिती त्यात असणार आहे. जीपीएसच्या मदतीने ‘आसरा’ ॲपद्वारे वैयक्तिक झोपडीची माहिती, प्रस्तावित योजना व झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र घोषीत असलेल्या योजनांची माहिती या ॲपद्वारे मिळू शकते. तसेच सामान्य झोपडीधारक हे आपली झोपडी व झोपडपट्टीसंबंधित झोपडी क्रमांक, गाव, प्रभाग, तालुका, जिल्हा, स्लम क्लस्टर २०१६ आदी माहिती घेऊ शकतात.

जाहिरात

पोलीसनामाचे फेसबुक पेज लाईक करा.

पोलीसनामाला ट्विटरवर फाॅलो कर.

पोलीसनामाचे युट्यूब चॅनेलला सब्सक्राईब करा.