विरोधी पक्षनेते साने यांनी केला महामेट्रोच्या निकृष्ट दर्जाच्या कामाचा पर्दाफाश

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

पुणे महामेट्रोच्या निकृष्ट दर्जाच्या कामाचा पर्दाफाश झाला आहे. निकृष्ट दर्जाचे पिलरचे काम झाल्याचे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी शहरात निदर्शनास आणले. त्यानंतर महामेट्रोने दोन अभियंत्यांना तडकाफडकी निलंबित केले.
[amazon_link asins=’B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1e86a5a0-af5d-11e8-82c6-0f092e7519a5′]

पुणे महामेट्रोच्या स्वारगेट ते पिंपरी या पहिल्या टप्याचे काम पिंपरीपर्यंत वेगात सुरु आहे. मोठ्या प्रमाणात पिलर उभारले आहेत. परंतु, दापोडीच्या पुढे मेट्रोचे काम ठप्प आहे. पिंपरीपर्यंत तयार झालेल्या पिलरचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केला आहे.

जाहिरात

कासारवाडी येथील मेट्रोच्या पिलरचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले आहे. पिलरच्या सळया बाहेर आल्या आहेत. पिलरमध्ये सिमेंट अर्धवटपणे भरल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भविष्यात याचा मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. महामेट्रो नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. तसेच शहरातील आतापर्यंत झालेल्या मेट्रोच्या कामाचे स्ट्रक्चरल ऑडिट मान्यता प्रात्त सरकारी संस्थेकडून करावे, अशी मागणीही त्यांनी केली होती.
[amazon_link asins=’B0784BZ5VY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’24bcea74-af5d-11e8-b9cf-1dff5b599176′]

त्यानंतर खडबडून जागे झालेल्या महामेट्रोने निकृष्ट कामास जबाबदार असल्याचा ठपका ठेवत दोन अभियंत्यांना तडकाफडकी निलंबित केले आहे. तसेच या पिलरची त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी केली जाणार आहे. पिलर निकृष्ट आढळल्यास त्याची दुरुस्ती केली जाणार आहे. योग्य असल्यासच तो पिलर वापरला जाईल, असे महा मेट्रोचे मुख्य प्रकल्प व्यवस्थापक गौतम बिऱ्हाडे यांनी सांगितले. तसेच कामाचा दर्जा आणि सुरक्षिततेची पूर्णपणे काळजी घेतली जाणार असल्याचेही, त्यांनी सांगितले.

जाहिरात