Leaf for Uric Acid | अतिशय चमत्कारी आहेत ‘ही’ ५ सामान्य पाने, नियमित करा सेवन, यूरिक अ‍ॅसिडचा करतील नाश, जाणून घ्या वापरायची पद्धत

नवी दिल्ली : Leaf for Uric Acid | यूरिक अ‍ॅसिड हा शरीरात साठलेला एक घाणेरडा पदार्थ आहे. शरीरातील प्युरीन नावाच्या केमिकलचे विघटन हे त्याच्या निर्मितीचे मुख्य कारण आहे. ते रक्तामध्ये जास्त प्रमाणात झाल्याने सांध्यांमध्ये क्रिस्टलच्या स्वरूपात जमा होते, ज्यामुळे रुग्णांना असह्य वेदना, सूज, लालसरपणा अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यूरिक अ‍ॅसिड नियंत्रित करणाऱ्या काही आरोग्यदायी पानांबद्दल जाणून घेऊया (Leaf for Uric Acid) –

कोथिंबीरीची पाने :

शरीरातून यूरिक अ‍ॅसिड बाहेर काढण्यासाठी कोथिंबीर व्यवस्थित वाटून घ्या. त्यानंतर ती पाण्यात मिसळून प्या. काही दिवसात आराम मिळेल. (Leaf for Uric Acid)

कढीपत्ता :

यूरिक अ‍ॅसिड दूर करण्यासाठी कढीपत्त्याची १० ते १५ पाने एक ग्लास पाण्यात टाकून सुमारे १ तास ठेवा. नंतर हे पाणी सेवन करा. यामुळे युरिक अ‍ॅसिड नियंत्रित राहते.

विड्याचे पान :

विड्याच्या पानांचा अर्क रक्तातील यूरिक अ‍ॅसिडचे स्फटिक बाहेर फेकतो. ही पाने नियमितपणे कच्ची चावून खा. यामुळे मोठ्या प्रमाणात आराम मिळेल.

मेथीची पाने :

युरिक अ‍ॅसिड नियंत्रित ठेवण्यासाठी मेथीची भाजी, पराठा, पुरी असे पदार्थ खाऊ शकता. तसेच, ते डिटॉक्स वॉटर किंवा पेय स्वरूपात सेवन करू शकता.

तुळशीची पाने :

तुळशीची पाने नियमितपणे चघळल्यास यूरिक अ‍ॅसिडचे प्रमाण कमी होते. तसेच वजन कमी होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Digestion In Monsoon | पावसाळ्यात डायजेशन सुधारण्यासाठी अवलंबा ‘या’ 5 आयुर्वेदिक टिप्स, पोटाच्या समस्या होतील दूर