शरद पवारांनी दिला सचिन तेंडुलकरला सल्ला, म्हणाले – ‘आपलं क्षेत्र सोडून इतर विषयांवर बोलताना…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर याने पोस्ट केलेल्या #IndiaTogether & #IndiaAgainstPropaganda या ट्विटनंतर सोशल मीडियावर नेटिझन्स खवळलेत. दिल्लीमधील शेतकरी आंदोलनाला अनुसरुन पॉप स्टार गायिका रिहाना हिने केलेल्या ट्विटला अप्रत्यक्षपणे उत्तर सचिनने आपल्या ट्टिटमधून दिलंय. सचिनच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर त्याला ट्रोल केलं जात आहे.

केरळमधील युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सचिनच्या लाकडी कटआऊटला काळ्या ऑईलने अंघोळ घालून सचिनच्या ट्विटचा निषेध नोंदवलाय. केरळ राज्यातील कोची येथे हा प्रकार घडला होता. याबद्दल माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केलीय. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी भूमिपुत्राचा, महाराष्ट्र भूषण व देशाचं भूषण असलेल्या सचिनचा हा अवमान सहन करणार का? असा प्रश्नही देवेंद्र फडणवीस यांनी विचारलाय. यादरम्यान सचिन तेंडुलरकच्या विधानाबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिलीय.

सचिनने केलेल्या शेतकऱ्याबाबतच्या विधानानंतर अनेक सामान्य लोक आक्रमक होताहेत. त्यामुळे “आपलं क्षेत्र सोडून इतर विषयांवर बोलताना सचिन तेंडुलकरने काळजी घ्यावी, असा माझा सल्ला आहे, असे शरद पवारांनी सांगितलंय. तसेच इतके दिवस शेतकरी जर रस्त्यावर बसताहेत तर त्याचा विचार करायला पाहिजे. शेतकऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात आता आंतरराष्ट्रीय स्तरावरून प्रतिक्रिया येत आहेत. हे खरं तर चांगलं नाही, असेही शरद पवार यांनी सांगितलंय.

नरेंद्र तोमर यांचा अनादर करण्याचा हेतू नाही. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पुढाकार घ्यावा. कदाचित त्यातुन मार्ग निघण्याची शक्यता वर्तविली जात आहे. स्वातंत्र्यानंतर कधी असं घडलं नाही, सरकारने ही टोकाची भूमिका घेतल्यावरुन त्यांचे धोररण स्पष्ट होत आहे. अन्नदाता जर रस्त्यावर बसत असेल तर त्याला प्रतिसाद दिला पाहिजे, असेही पवारांनी केंद्र सरकारला सांगितलं आहे.

“कोण कुठली रिहाना? कोण बाई आहे ती? तिला का इतकं महत्वं दिलं जातंय? तिनं ट्विट करायच्याअगोदर तिला कुणी ओळखत तरी होतं का? आणि अशा व्यक्तीनं ट्विट केल्यानंतर आपल्या देशातील भारतरत्न धारकांना सरकारनं ट्विट करायला लावणं हे बरोबर नाही”, तसेच कृषी कायदे फायद्याचे आहेत. पण ते फक्त एक-दोघांसाठी फायदेशीर ठरू नयेत, इतकंच लोकांचं म्हणणं आहे. त्यामुळे कृषी मंत्री आणि आंदोलकांमध्ये चर्चेनं तोडगा निघत नसेल. मग, पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांना एक फोन करुन विषय मिटवून टाकावा, असेही मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी म्हटलंय.

आंतरराष्ट्रीय पॉप स्टार रिहाना हिने शेतकरी आंदोलनाबाबद ट्विट केल्यानंतर तिला भारतीयांच्या रोषाचा सामना करावा लागतोय. सचिननं केलेलं ट्विट हे रिहानाला अप्रत्यक्ष सुनावणारे होते. ”भारताच्या सार्वभौत्मासंदर्भात कसल्याही प्रकराची तडजोड केली जाऊ शकत नाही. भारताच्या अंतर्गत बाबतीत बाहेरील शक्ती केवळ प्रेक्षक असू शकतात, ते याचा भाग होऊ शकत नाहीत. भारतातील नागरिक भारत देशाला चांगले ओळखतात. यामुळे त्यांनीच भारतासंदर्भात निर्णय घ्यायला हवेत. देश एकसंध रहायला हवा,” असेही ट्विट सचिननं केलं होतं.

“सचिनची बॅटींग बघत लहानाचा मोठा झालोय. तो माझ्यासाठी क्रिकेटचा देव होता. आयुष्यात अनेक निराश क्षणी मी त्याच्या इनिंग्ज बघायचो, खूप बरं वाटायचं. त्याच्या अनेक गोष्टी मनाला पटल्या नाहीत पण, हे कधी बदललं नव्हतं. पण, आता मात्र इथून पुढे सगळं वेगळं असेल. राग येतो पण वाईट जास्त वाटतंय!” असं ट्विट दिग्दर्शक समीर विध्वंस यांनी केलंय.