नाणार प्रकल्पाच्या मुद्यावरून विधीमंडळ कामकाज ठप्प

नागपुरः पोलीसनामा आॅनलाइन
नाणार (रत्नागिरी) येथील मेगा रिफायनरी प्रकल्पाच्या मुद्यावरून सभागृहात विरोधकसह शिवसेना देखील चांगलीच आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले. हा प्रकल्प रद्द करावा,अशी मागणी करत विरोधकांनी सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे कामकाज तहकूब करावे लागले.
[amazon_link asins=’B079GSN32S’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4e9f1967-86a7-11e8-9628-899ee5feeee1′]

तसेच सहावीच्या मराठी पुस्तकातील दोन पाने गुजराती भाषेत प्रसिद्ध झाल्याचा मुद्दाही विधीमंडळात उपस्थित करण्यात आला. या मुद्यावरून देखील कामकाज काही वेळ तहकुब झाले होते.

दरम्यान, नाणार येथील मेगा रिफायनरी प्रकल्पाबाबत स्थानिक शेतकरी, नागरिकांना विश्वासात घेऊन व चर्चा करुनच याबाबत निर्णय घेतला जाईल. स्थानिकांच्या संमतीशिवाय हा प्रकल्प लादला जाणार नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अगोदरच स्पष्ट केले आहे.
[amazon_link asins=’B076H74F8N’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e1edfa13-86a7-11e8-86c0-eb022a44f216′]