मित्राला हातउसने पैसे देणे पडले महागात

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन

मित्राला घर बांधण्यासाठी हातउसने दिलेले पैसे मागितले म्हणून, मित्राने पैसे।देणाऱ्या मित्राला पळवून नेवून, त्याच्या इतर मित्राच्या मदतीने लाकडी दांडके, लोखंडी रॉडने मारहाण करुन जखमी केले. तसेच पोलिसात तक्रार केल्यास जाळून टाकण्याची धमकी दिली. हा प्रकार पंधरा ऑगस्ट रोजी सायंकाळी साडे पाचच्या सुमारास चाकण येथे घडला.

या प्रकरणी अमित संजय साळवे (१९, रा. जय भारत चौक, चाकण) याने फिर्याद दिली असून त्याला मारहाण झाली आहे. तर रोहित मिसर, अजिंक्य राणे, दिपक परदेशी, आदित्य मेदनकर, महादू सर्व रा. चाकण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

[amazon_link asins=’B0002E3MP4′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5019699e-a1e7-11e8-bcd9-7dbef2f37291′]

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमित आणि रोहित मित्र आहेत. अमितने रोहितला ११ हजार रुपये घर बांधण्यासाठी दिले होते. अमितला पैशांची गरज भासत असल्याने तो रोहितकडे पैशांची मागणी करत होता. मात्र रोहित पैसे देण्यास टाळाटाळ करत होता.
पंधरा ऑगस्ट रोजी रोहित याने अमितला पैसे देतो असे सांगून बोलावून घेतले. त्यानंतर रोहित त्याला गाडीवर बसवून मित्राच्या पानटपरीजवळ घेऊन गेला. अगोदरच तिथे उभा असणाऱ्या रोहीतच्या मित्राने अमितला जबरदस्तीने पळवून एका प्लॅटवर नेले. तिथे त्याला लाकडी दांडके, लोखंडी रॉडने मारहाण करुन जखमी केले. तसेच याबाबत पोलिसांकडे तक्रार दिल्यास जाळून टाकण्याची धमकी दिली. तपास चाकण पोलीस करत आहेत.