6,6,6,6,6,6 ! ‘या’ खेळाडूनं एकाच ‘ओव्हर’मध्ये ठाकेले 6 ‘सिक्स’, तरी देखील युवराज सिंहचं ‘किंग’ (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – न्यूझीलंडचा फलंदाज लिओ कार्टरने रविवारी सहा चेंडूत सलग सहा षटकार ठोकले आणि अशी कामगिरी करणारा तो जगातील सातवा फलंदाज ठरला. न्यूझीलंडच्या डोमेस्टिक टी -२० लीग सुपर स्मॅशमध्ये आपल्या ताबडतोब फलंदाजीचे प्रदर्शन करताना कार्टरने २९ चेंडूत ७० धावा केल्या.

कॅन्टरबरीकडून खेळत असताना कार्टरने नॉर्दर्न नाईट्सचा फिरकीपटू अँटोन डेवसिच विरुद्ध सामन्याच्या १६ व्या ओव्हर मध्ये सलग सहा षटकार ठोकले. यासह टी -२० क्रिकेटमध्ये एका ओव्हरमध्ये सहा षटकार
मारणारा तो जगातील चौथा फलंदाज ठरला आहे. या यादीतील पहिले नाव युवराज सिंग याचे आहे. तर रॉस व्हाइटली दुसर्‍या क्रमांकावर आहे. २०१८ मध्ये अफगाणिस्तानच्या हजरतुल्ला जजईने देखील एका ओव्हरमध्ये सहा षटकार ठोकले होते.

त्याचबरोबर अशी कामगिरी करणारा तो जगातील सातवा फलंदाज ठरला आहे. गॅरी सोबर्स, रवी शास्त्री आणि हर्शल गिब्स यांनीही ही कामगिरी केली आहे. वेस्ट इंडीजचे गॅरी सोबर्स, भारताचे रवी शास्त्री आणि दक्षिण आफ्रिकेचे हर्शेल गिब्स यांनी टी -२० व्यतिरिक्त दुसऱ्या फॉरमॅट मध्ये सहा चेंडूंत सहा षटकार लगावले आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/